धक्कादायक! खेळता खेळता 30 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला 4 वर्षांचा चिमुकला, रेस्क्यू ऑपरेशन सुरू
भागीरथ आपल्या मुलाला आणि दुसऱ्या मुलीला घेऊन शेतावर काम करण्यासाठी आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भागीरथ शेताला पाणी देत होता तर दोन्ही मुलं झाडाखाली खेळत होती.
महोबा, 02 डिसेंबर : कडुनिंबाच्या झाडाखाली दुपारच्या वेळी खेळत असताना अचानक पाय घसरून 4 वर्षांचा चिमुकला बोअरवेलमध्ये पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चिमुकल्याला वाचवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. या बोअरवेलच्या खड्ड्याची खोली 30 फूट खोल आहे. पोलीस, रुग्णवाहिका आणि स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले असून 4 वर्षांच्या चिमुकल्याचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील कुलपहाड परिसरात बुधौरा गावात ही घटना समोर आली आहे. शेतकरी भागीरथी कुशवाह यांचा 4 वर्षांचा मुलगा धनेंद्र 30 फूट खोल बोअरवेलसाठी खणलेल्या खड्ड्यात खेळताना पडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि जेसीबीची टीम अधिकारी घटनास्थळी दाखळ झाले आहेत.
Mahoba: A four-year-old boy falls into an open borewell in Kulpahar area, rescue operation underway. pic.twitter.com/lFmiN2rHQ4
शेतकरी भागीरथ यांची घर शेतापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. त्यांची पत्नी आणि लहान मुलगी सकाळी आधारकार्डचं काम कऱण्यासाठी महोबा इथे आले होते. तर भागीरथ आपल्या मुलाला आणि दुसऱ्या मुलीला घेऊन शेतावर काम करण्यासाठी आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भागीरथ शेताला पाणी देत होता तर दोन्ही मुलं झाडाखाली खेळत होती.
दुपारी साधारण 1 च्या आसपास शेतात असलेल्या बोअरवेलच्या खड्ड्यात 4 वर्षांचा धनेंद्र पडला. खूप वेळ झाला तरी धनेंद्र बाहेर न आल्यानं बहीण रेखानं आपल्या वडिलांना याची माहिती दिली. वडिलांनी धनेंद्रला आवाज दिला तर खड्ड्यातून जोरजोरात रडण्याचा आवाज आला.
शेतकरी भागीरथ यांनी याची माहिती पोलिसांना दिली. अग्निशन दल, पोलीस प्रशासन, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून सध्या बचावकार्य सुरू केला आहे. जेसीबी आणि अग्निशन दलाकडून 30 फूट बोअरवेलच्या खड्ड्यातून चिमुकल्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.