Home /News /national /

नव्यानं बांधलेलं स्मशानाचं छत कसं कोसळलं? NDRF कडून धक्कादायक खुलासा

नव्यानं बांधलेलं स्मशानाचं छत कसं कोसळलं? NDRF कडून धक्कादायक खुलासा

या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून अद्याप फरार कंत्राटदाराचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

    गाझियाबाद, 04 जानेवारी : स्मशानाचं छत कोसळल्याची दुर्घटना रविवारी संध्याकाळी समोर आली होती. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 25 वर पोहोचला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे छत तीन चार महिन्यांपूर्वीच बांधण्यात आलं होतं आणि त्यानंतर कोसळल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील स्मशान घाटात कॉरिडॉरचं छत कोसळून 25 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. मुरादनगर महानगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी निहारिका सिंह, कनिष्ठ अभियंता चंद्रपाल आणि पर्यवेक्षक आशिष यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात कंत्राटदार अजय त्यागी अद्याप फरार आहे. मंडलयुक्त अनिता सी मेश्राम यांच्या सूचनेवरून दोषी गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणासह अन्य कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे वाचा-पाकिस्तानी महिला बेकायदेशीरपणे 30 वर्षं राहतेय भारतात; गावची सरपंचही झाली! NDRF टीनं याबाबत माहिती देताना धक्कादायक खुलासा केला आहे. या स्मशानाचं छत 4 महिन्यांपूर्वी बांधण्यात आलं होतं. छत बांधण्यासाठी वापरण्यात आलेलं सामान अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतं. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं आहे. गाझियाबादमधील डिफेन्स कॉलनी परिसरातील एका वृद्ध व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी त्याच्या परिवारातील मंडळी स्माशानात जमली होती. अत्यंसंस्काराचा विधी सुरु असतानाच अचानक त्यांच्या अंगावर स्माशानाचं छत कोसळलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Uttar pardesh, Uttar pradesh news

    पुढील बातम्या