मावशी-भाच्याच्या नात्याला काळीमा! धावत्या कारमध्ये केला बलात्कार

मावशी-भाच्याच्या नात्याला काळीमा! धावत्या कारमध्ये केला बलात्कार

25 वर्षांच्या महिलेवर भाच्यासह त्याच्या मित्रानं बलात्कार करून हत्या केल्याची घटना समोर आली.

  • Share this:

कानपूर, 11 ऑक्टोबर : हाथरसनंतर देशभरात दिवसेंदिवस अनेक महिलांवरील अत्याचाराच्या घटना ठळकपणे समोर येत आहेत. त्यामध्ये आता आणखीन एक धक्कादायक घटना घडली आहे. मावशी आणि भाच्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली. 25 वर्षांच्या महिलेवर भाच्यासह त्याच्या मित्रानं बलात्कार करून हत्या केल्याची घटना समोर आली. उन्नाव जिल्ह्यातील आग्रा-लखनऊ मार्गावर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साबली खेरा गावाजवळ 25 वर्षांची महिला बेशुद्ध अवस्थेत होती. याची माहिती स्थानिकांनी त्यांना दिल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार धावत्या कारमध्ये या महिलेवर भाच्यासह त्याच्या मित्रानं बलात्कार केल्याची घटना घडली आणि तिला जीवे मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

हे वाचा-अंगणात वाहत होता रक्ताचा पाट; नेत्यासह कुटुंबाची गळा चिरून हत्या, परिसरात खळबळ

25 वर्षांच्या या तरुणीचा बलात्कार केल्यानंतर दोघांनी तिचा गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला. बेशुद्ध झाल्यावर या तरुणीला धावत्या कारमधून फेकून देण्यात आलं. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून तरुणीच्या भाच्यासह मित्राविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकऱणी पोलिसांकडून तपास सुरू असून तरुणीवर उपचार सुरू आहेत. तरुणीची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 11, 2020, 3:12 PM IST

ताज्या बातम्या