भरधाव ट्रकची दोन टेम्पोंना भीषण धडक, 15 जणांचा मृत्यू

भरधाव जाणाऱ्या ट्रकनं दोन टेम्पोंना दिलेल्या धडकेमुळे भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत 15 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2019 01:24 PM IST

भरधाव ट्रकची दोन टेम्पोंना भीषण धडक, 15 जणांचा मृत्यू

लखनौ, 27 ऑगस्ट : भरधाव जाणाऱ्या ट्रकनं दोन टेम्पोंना दिलेल्या धडकेमुळे भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत 15 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशातील शाहजहाँपूर येथे मंगळवारी (27 ऑगस्ट) ही भीषण घटना घडली. जमुकाजवळील राष्ट्रीय महामार्ग 24वर चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि दोन टेम्पोंना त्याची धडक बसली. यामध्ये 15 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एक महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना शाहजहाँपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली.  पोलीस अधीक्षक दिनेश त्रिपाठी यांनी सांगितलं की, सीतापूरहून भरधाव येणाऱ्या ट्रकनं लखनौ-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर  एका टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. यानंतर टेम्पो एका खड्ड्यात पडला. याच ट्रकनं पुढे जाऊन आणखी एका टेम्पोला धडक दिली.

(वाचा : देवदर्शनानंतर भाविकांवर काळाचा घाला, सोलापुरात एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा मृत्यू)

(वाचा : गायक आनंद शिंदेंच्या गाडीला पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात, थोडक्यात बचावले)

या भीषण अपघातात 15 जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळावरील मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचीही घोषणा केली आहे.

(वाचा : चार्टर्ड विमान कोसळून लागली आग, दुर्घटनाग्रस्त विमानात होते 6 प्रवासी)

मम्मी के बच्चे प्यारे प्यारे! वैतागलेल्या आईला असं समजावतोय पोपट; पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 01:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...