PM मोदींच्या नावानं चिठ्ठी लिहून 14 वर्षीय मुलीची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये सांगितली अंतिम इच्छा

PM मोदींच्या नावानं चिठ्ठी लिहून 14 वर्षीय मुलीची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये सांगितली अंतिम इच्छा

14 वर्षीय विद्यार्थिनी आंचल गिरीने राहत्या घरात आत्महत्या केली. दरम्यान, आता पोलिसांना आंचलची सुसाइड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये आंचलने मृत्यूला स्वत: लाच जबाबदार धरले आहे.

  • Share this:

संभल (उत्तर प्रदेश), 19 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) एक दिवस उत्तर प्रदेशातील संभल शहर एका आत्महत्येनं हादरलं. 14 वर्षीय विद्यार्थिनी आंचल गिरीने राहत्या घरात आत्महत्या केली. दरम्यान, आता पोलिसांना आंचलची सुसाइड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये आंचलने मृत्यूला स्वत:लाच जबाबदार धरले आहे. त्याचबरोबर सुसाइड नोटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे.

गुन्नर पोलीस स्टेशन परिसरात 14 ऑगस्ट रोजी आंचलनं आत्महत्या केली. त्यावेळी हे प्रकरण संशयास्पद असल्याचे वर्णन पोलिसांनी केले होते. मात्र सुसाइड नोट समोर आल्यानंतर आता याला आत्महत्या म्हणून घोषित करण्यात आले आहे.

सुसाइड नोटमध्ये लिहिलं आत्महत्येचं कारण

14 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता पोलिसांना अशी माहिती मिळाली, गुन्नरमध्ये एका 14 वर्षी मुलीनं आत्महत्या केली आहे. घटनास्थळी पोलिसांनी एफएसएल पथकासह तपास केला आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला. पोस्टमॉर्टममध्ये आत्महत्येचा संशयही घेण्यात आला होता. काही दिवसांनंतर, आंचलची सुसाइड नोट सापडली आहे, ज्यामध्ये तिने मृत्यूसाठी स्वतःलाच दोषी ठरवले आहे आणि असे लिहिले आहे की कुटुंबाने अस्वस्थ होऊ नये.

वाचा-सुशांत प्रकरणी SC च्या निर्णयानंतर नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया

वाचा-भरदिवसा व्यावसायिकाला जिवंत जाळलं; 90 टक्के भाजलं शरीर

सुसाइड नोटमध्ये पंतप्रधान मोदींच्या नावाचाही उल्लेख

आंचलने आपल्या सुसाइड नोटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचाही उल्लेख केला होता. आंचलनं सुसाइड नोटमध्ये, "देशात बरेच पंतप्रधान होऊन गेले मात्र तुमच्यासारखे कोणीच नाही. माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप आदर आहे. मला जमलं असत तर माझं वय मी तुम्हाला दिलं असतं. हा देश अनेक वर्षांपासून अंधारात होता आणि आता तुम्ही सूर्य म्हणून या देशात उदयास आला आहात. तुम्हाला भेटण्याची माझी इच्छा होती, मात्र ती अपूर्ण राहिली. तुम्ही कायम असेच देशाची सेवा करा", असे लिहित आंचलनं श्रीराम मंदिराचे बांधकाम होत आहे, त्याबद्दलही समाधान व्यक्त केले.

Published by: Priyanka Gawde
First published: August 19, 2020, 3:48 PM IST

ताज्या बातम्या