कानपूर : मोठा स्फोट होऊन उलटली 'पूर्वा एक्स्प्रेस', 28 प्रवासी जखमी

कानपूर : मोठा स्फोट होऊन उलटली 'पूर्वा एक्स्प्रेस', 28 प्रवासी जखमी

  • Share this:

लखनौ, 20 एप्रिल :   हावडाहून नवी दिल्लीला जाणाऱ्या पूर्वा एक्स्प्रेसला (अप 12303)शुक्रवारी (19 एप्रिल)उशिरा रात्री भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक्स्प्रेसचे 12 डबे रूळावरून घसरले. यामध्ये 28 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातामुळे रेल्वे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. प्रयागराज-कानपूरदरम्यान हा अपघात झाला आहे. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. सुदैवानं दुर्घटनेत अद्यापही कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, घटना प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांना अपघातामागील कारण तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घटनास्थळावरून एटीएसचं पथकदेखील दाखल झाले आहे. अपघातामुळे या मार्गावरील काही गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ स्वरुपात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारानंतर कानपूर सेंट्रलला रवाना करण्यात आलं आहे. येथून प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून विशेष लोकलनं त्यांना नवी दिल्लीला नेण्यात येईल.

कपलिंग तुटल्यानं झाला अपघात

हावडाहून दिल्लीला जाणाऱ्या पूर्वा एक्स्प्रेस आपल्या नियोजित वेळ रात्री 12.49 वाजून रूमा स्टेशन सुटली आणि यानंतर बरोबर एका मिनिटानंतर अपघात झाल्याची माहिती समोर आली. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. मिळालेल्या माहितीनुसार, एक्स्प्रेसचं कपलिंग तुटल्यानं अपघात झाला.

हेल्पलाइन क्रमांक जारी

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर डीएम विजय विश्वास पंत तातडीनं तेथे दाखल झाले आणि जखमींच्या प्रकृतीची विचारपूसदेखील केली. शिवाय, प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांकदेखील जारी करण्यात आले आहेत.

(033) 26402241

(033) 26402242

(033)26402243

(033)26413660

 

VIDEO : प्रकाश आंबेडकरांची राज ठाकरेंवर सडकून टीका, म्हणाले...

First published: April 20, 2019, 6:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading