झोपलेल्या युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला कोब्रा, खांबाला धरून काढावी लागली रात्र

झोपलेल्या युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला कोब्रा, खांबाला धरून काढावी लागली रात्र

साप चावण्याची शक्यता असल्याने कोणीही तो काढण्याचा प्रयत्न केला नाही. शेवटी काही लोकांच्या सांगण्यावरून सर्पमित्राला बोलावण्यात आलं होतं.

  • Share this:

मिर्झापूर 28 जुलै: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक प्राणी जमिनीमधून बाहेर येत असतात. त्यात सगळ्यात जास्त प्रमाण असतं ते सापांचं. (Snake) याच काळात साप हे जमिनीतून बाहेर येतात कारण जमीन थंड झालेली असते. उन्हाळ्यात साप हे बिळातच राहण्याचा प्राधान्य देतात. त्यामुळे पावसाळ्यात शेतात काम करतांना आणि उघड्यावर झोपतांना जास्त काळजी घेतली जाते. उत्तर प्रदेशातल्या मिर्झापूरमध्ये (Mirzapur)  एक तरुण झोपलेला असतांना त्याच्या जीन्स पॅन्टमध्ये (Jeans Pant)  विषारी कोब्रा (Cobra Snake)  घुसल्याची घटना घडली त्यामुळे त्या युवकाला सर्व रात्र जागून काढावी लागली.

मिर्झापूर जवळच्या सिकंदराबादमध्ये सौभाग्य योजनेत काही मजूर काम करत होते. एका शाळेत  त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यातच अलाबादचा लवलेश हा तरुणही काम करत होता. रात्री काम झाल्यानंतर त्याने जेवण केलं आणि तो झोपी गेला.

रात्री 12 च्या सुमारास त्याने घातलेल्या जीन्स पॅन्टमध्ये त्याला काही वळवळ होत असल्याचं जाणवलं. जाग आल्यावर त्याला जाणीव झाली की आपल्या पॅन्टमध्ये साप गेला. त्यानंतर तो कसाबसा उठला आणि जवळच्या खांबाला धरून उभा राहिला.

काश्मीरमध्ये 1 हजार फुटांवर ‘केबल’ पूलावरून रेल्वे धावणार सुसाट; पाहा VIDEO

रात्र असल्याने त्याच्या कोणीच मदतीला आले नाही. प्रचंड घाबरलेल्या असवस्थेत तो तसाच त्या खांबाला धरून तो तब्बल सात तास उभा होता. सकाळ झाल्यावर आजुबाजूच्या लोकांना नेमकं काय झालं ते कळलं. तोपर्यंत त्या युवकाला कुठलीही हालचाल करू नको असं सांगण्यात आलं होतं.

साप चावण्याची शक्यता असल्याने कोणीही तो काढण्याचा प्रयत्न केला नाही. शेवटी काही लोकांच्या सांगण्यावरून सर्पमित्राला बोलावण्यात आलं होतं.

गर्भगृहाखाली 200 फुटांवर ठेवली जाणार ‘टाइम कॅप्सुल’? ट्रस्ट ने केला मोठा खुलासा

नंतर एका सर्पमित्राला बोलावून सर्व घटना सांगण्यात आली. त्याने शिताफीने त्याचा जीन्स कापला आणि सगळ्यांनाच धक्का बसला. त्यात अत्यंत जहाल असा कोब्रा नाग आढळला. त्या युवकाच्या सुदैवाने तो साप त्याला चावला नाही. तो साप चावला असता तर त्याचा काही क्षणात मृत्यूच झाला असता.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 28, 2020, 6:32 PM IST

ताज्या बातम्या