'राहुल गांधींसाठी हा धडा शिकण्यासारखा', पर्रिकरांच्या मुलाचे ट्विट

'राहुल गांधींसाठी हा धडा शिकण्यासारखा', पर्रिकरांच्या मुलाचे ट्विट

दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्या भेटीच्या राजकारणावरून त्यांच्या मुलाने राहुल गांधी यांना उद्देशून ट्विट केले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला क्लीन चिट दिली. त्यानंतर माजी संरक्षण मंत्री आणि दिवंगत मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकरने ट्विट करून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय राहुल गांधी यांच्यासाठी एक धडा आहे. त्यांनी यातून शिकावं.

उत्पल पर्रिकर यांनी म्हटलं की, राफेलवर निर्णय आला आहे. मला आशा आहे की राहुल गांधी यांना यातून शिकण्यासारखं आहे. मी त्यांना शंका घेण्याचं स्वातंत्र्य देऊ शकतो. मात्र त्यांनी जे काही केलं आणि ज्या प्रकारे राजकारणासाठी माझ्या आजारी असलेल्या वडिलांशी भेटले त्यात एक राजकीय स्वार्थ दडला होता.

राहुल गांधी यांनी 29 जानेवारी 2018 मध्ये उपचार घेत असलेले गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पर्रिकर यांची भेट घेतली होती. पर्रिकर यांचे 17 मार्चला निधन झालं. त्याभेटीचा संदर्भ देत उत्पल यांनी राहुल गांधी यांना धारेवर धरलं.

पर्रिकर यांच्या भेटीनंतर राहुल गांधींनी दावा केला होता की, पर्रिकरांनी त्यांना राफेल खरेदी व्यवहारात केलेल्या बदलांबाबत पंतप्रधान मोदींनी अंधारात ठेवलं असं सांगितलं. राहुल गांधींचा हा दावा फेटाळून लावण्यात आला होता. त्यांनी पाच मिनिटांच्या भेटीचा राजकीय स्वार्थासाठी दुरुपयोग नाही केला पाहिजे असं पर्रिकर म्हणाले होते.

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी न्यायालयात राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणी पंतप्रधान मोदींविरुद्ध चुकीच्या पद्धतीने टीका केल्याबद्दल फटकारले. तसेच भविष्यात याबद्दल काळजी घ्या असंही बजावलं आहे. यासह सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेली अवमान याचिकेवरील सुनावणी पूर्ण केली.

VIDEO : सेनेच्या तीन अंकी नाटकावर लक्ष्य, आशिष शेलारांचा टोला

Published by: Suraj Yadav
First published: November 15, 2019, 12:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading