व्हॉट्सअॅप शिवाय 'या' अॅपवरून शिजत होता देशावर हल्ल्याचा कट!

व्हॉट्सअॅप शिवाय 'या' अॅपवरून शिजत होता देशावर हल्ल्याचा कट!

राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)ने दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये 17 ठिकाणी छापे टाकून 10 अतिरेक्यांना अटक केली

  • Share this:

नवी दिल्ली, 26 डिसेंबर : राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)ने दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये 17 ठिकाणी छापे टाकून 10 अतिरेक्यांना अटक केली आहे. या अतिरेक्यांनी ऐकमेकांशी संवाद साधण्यासाठी 'व्हाॅट्सअॅप' आणि 'टेलीग्राम'चा वापर केला अशी माहिती एनआयचे आयजी अलोक मित्तल यांनी दिली.

"या अतिरेक्यांनाकडून 7.5 लाख रुपयांची रोख जप्त करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल 100 मोबाईल फोन्स आणि 135 सीम कार्ड जप्त करण्यात आले आहे", अशी माहिती अलोक मित्तल यांनी दिली.

"हे अतिरेकी व्हाॅट्सअॅप आणि टेलीग्राम या अॅपच्या माध्यमातून ऐकमेकांशी संवाद साधत होते", असंही मित्तल यांनी सांगितलं आहे.

मित्तल पुढे म्हणाले की, "अतिरेक्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि देशी रॉकेट लॉन्चर्स जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून 1 देशी राॅकेट लाॅन्चर, 12 देशी बनावटीच्या बंदुका आणि मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा सापडला. त्यांचा आत्मघातकी हल्ल्याचाही कट होता आणि ISI या दहशतवादी संघटनेसारखं मोड्युल या अतिरेक्यांनी विकसित केलं होतं"
देशभरातली महत्त्वाची ठिकाणं, राजकीय नेते, संस्था, गर्दीची ठिकाणं लक्ष्य करण्याचा या अतिरेक्यांचा डाव होता. अतिरेक्यांच्या हालचालीची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळताच त्यांनी तातडीने कारवाई करत अतिरेक्यांचा कट उधळून लावला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलीस मुख्यालय आणि दिल्लीतल्या RSS ऑफिससह अनेक मोठ्या जागा या अतिरेक्यांच्या रडारवर होत्या.

===================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 26, 2018 05:28 PM IST

ताज्या बातम्या