नवी दिल्ली 11 ऑगस्ट: केरळमध्ये उंचावर असलेल्या कोझिकोड इथल्या विमानतळावर आता आता मोठ्या विमानांना बंदी घालण्यात आली आहे. पावसाळ्यात ही बंदी असणार आहे. हवाई वाहतूक विभागाने आज हा निर्णय जाहीर केला आहे. 7 ऑगस्टच्या अपघातानंतर तज्ज्ञांनी आढावा घेऊन अशा प्रकारची सूचना केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला होता तर 150 जण जखमी झाले होते.
कोझीकोडचं विमानतळ टेबलटॉप म्हणजे पठारावर आहे आणि बाजूला खोल दरी आहे. त्यामुळे जोखमीच्या विमानळांमध्ये याचा समावेश होतो.
वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईहून केरळला येणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला होता तर 150 जण जखमी झाले होते. या अपघातात विमानाचे पायलट कॅप्टन दीपक साठे यांचाही मृत्यू झाला. कोझिकोड विमानतळ हे टेबल टॉप एअरपोर्ट आहे. त्यामुळे इथे विमान उतरत असताना धावपट्टीवर खूपच काळजीपूर्वक उतरवावं लागतं. अशातच शुक्रवारी मुसळधार पावसामुळे रनवेवर पाणी होतं आणि पावसाचा जोर वाढल्यानं धुसर दिसत होतं. त्यामुळेच हा अपघात झाला.
Use of wide-body aircraft at Kozhikode Airport during the monsoon season has been banned: Directorate General of Civil Aviation
मुसळधार पावसामुळे रनवेवर पाणी साठलं होतं याचवेळी विमान स्पीडने लँड झाल्यानं धावपट्टीवरून घसरून ते 35 फूट खोल खाली कोसळलं आणि दोन तुकडे झाले. धावपट्टीवरील पाण्यामुळे विमान घसरलं.
Published by:Ajay Kautikwar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.