अमेरिकेच्या अध्यक्षांवर लेखिकेकडून लैंगिक शोषणाचा आरोप, ट्रम्प म्हणाले... Donald Trump | Sexual Assault Allegation

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 22, 2019 10:16 AM IST

अमेरिकेच्या अध्यक्षांवर लेखिकेकडून लैंगिक शोषणाचा आरोप, ट्रम्प म्हणाले... Donald Trump | Sexual Assault Allegation

वॉशिंग्टन, 22 जून: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. एका बाजूला अमेरिका आणि इराण यांच्या युद्ध परिस्थिती निर्माण झाली असताना थेट अध्यक्षांवर अशा प्रकारचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्यावर एका लेखिकेने हा आरोप केला आहे. ई.जीन कॅरल असे या संबंधित महिलेचे नाव आहे. 90 दशकाच्या मध्यात मॅनहॅटन येथील एका डिपार्टमेंट स्टोरच्या ड्रेसिंग रुममध्ये ट्रम्प यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप कॅरल यांनी केला आहे. दरम्यान अध्यक्ष ट्रम्प यांनी कॅरल यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

स्तंभलेखीका असलेल्या कॅरल यांनी त्यांच्या hideous men पुस्तकातून ट्रम्प यांच्यावर आरोप लावले आहेत. कॅरल यांनी पुस्तकातून असाही दावा केला की त्यांनी आयुष्यभर पुरुषांच्या हिंसाचाराचा सामना केला. कॅरल यांनी केलेल्या आरोपानंतर ट्रम्प यांनी अशी कोणतीही घटना झालेलीच नाही आणि आपण त्यांना कधी भेटलोच नाही असे स्पष्टीकरण दिले आहे. कॅरल यांच्या पुस्तकातील काही भाग न्यूयॉर्क मासिकात प्रसिद्ध झाल्यानंतर ही बातमी समोर आली आहे. धक्कादायक ट्रम्प यांच्यावर आतापर्यंत 16 महिलांनी लौंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

कॅरल म्हणतात...

1995 अथवा 1996 साली बर्गडॉर्फ गुडमॅन येथे ट्रम्प याची एका मित्र म्हणून ओळख झाली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी त्यांच्यावर लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. पण ट्रम्प यांना धक्का देऊन तेथून पळ काढल्याचे कॅरल यांनी म्हटले आहे. कॅरल यांच्या दाव्याला ट्रम्प यांनी फेक न्यूज म्हटले आहे. या संदर्भात कोणताही पुरावा नाही, व्हिडिओ नाही, कुठे तक्रार देखील नाही. या घटनेचा व्हिडिओ फुटेज नाही का असा प्रश्न त्यांनी केला.

पाकिस्तानी कर्णधाराचा चाहत्यांकडून अपमान, VIDEO व्हायरल

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2019 10:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...