अमेरिकेचा पाकिस्तानवर ड्रोन हल्ला, हक्कानी कमांडर ठार

अमेरिकेचा पाकिस्तानवर ड्रोन हल्ला, हक्कानी कमांडर ठार

अमेरिकेने पाकिस्तानच्या फाटा भागात ड्रोन हल्ला केला आहे. यात हक्कानी नेटवर्कचे दोन कमांडर ठार झाले आहेत. अमेरिकेची ही कारवाई पाकिस्तानासाठी एक ठोस संदेश आहे.

  • Share this:

24 जानेवारी : पाकिस्तानात घुसून दहशतवादी ओसामा बिन लादेनला कंठस्नान घालणाऱ्या अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. अमेरिकेने आज पाकमधील दहशतवाद्यांच्या तळांवर ड्रोनद्वारे जोरदार हल्ला केला असून त्यात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत.

पाकिस्तान दहशतवादाविरोधात कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याबद्दलही अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक मदत रोखली होती. अमेरिकेने पाकिस्तानच्या फाटा भागात ड्रोन हल्ला केला आहे. यात हक्कानी नेटवर्कचे दोन कमांडर ठार झाले आहेत. अमेरिकेची ही कारवाई पाकिस्तानासाठी एक ठोस संदेश आहे.

वर्षाच्या सुरुवातीलाच ट्रम्प यांनी पाकिस्तानला इशारा देणारे टि्वट केले होते. पाकिस्ताननं आम्हाला खोटी आश्वासनं आणि फसवणुकीशिवाय काहीही दिलेलं नाही. पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे. त्यांनी आमच्या नेत्यांना मूर्ख बनवलं आहे.

First published: January 24, 2018, 4:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading