अमेरिकेत दोन विमानांची टक्कर, 5 जणांचा मृत्यू

अमेरिकेत दोन विमानांची टक्कर, 5 जणांचा मृत्यू

अमेरिकेतील अलास्कात येथे दोन विमानांची टक्कर झाल्याचे वृत्त आहे.

  • Share this:

अलास्का, 14 मे: अमेरिकेतील अलास्कात येथे दोन विमानांची टक्कर झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी आहेत. असोशिएट प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

यासंदर्भात 'युएसए टूडे'ने दिलेल्या वृत्तानुसार अग्नेय अलास्कामधील केटचिकान या शहरात हा अपघात झाला. दोन विमानाची हवेत टक्कर झाली. अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला याबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही. ही दोन्ही विमाने पाण्यावर उडणारी होती. प्रवाशांना घेऊन जाताना हा अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण अद्याप बेपत्ता आहे.

VIDEO: यशोमती ठाकूर यांचं पाण्यासाठी रौद्र रूप ,मुख्य अभियंत्याला धरले धारेवर

First published: May 14, 2019, 7:24 AM IST
Tags: USA

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading