'मसूद अझहरबद्दल चीनची भूमिका दुटप्पी', अमेरिकेने का केली टीका ?

'मसूद अझहरबद्दल चीनची भूमिका दुटप्पी', अमेरिकेने का केली टीका ?

जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरवर जागतिक बंदी आणण्यासाठी अमेरिका भारताच्या पाठिशी आहे. एवढंच नव्हे तर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये अमेरिका याबदद्ल नवा प्रस्ताव आणणार आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, २८ मार्च : जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरवर जागतिक बंदी आणण्यासाठी अमेरिका भारताच्या पाठीशी आहे. एवढंच नव्हे तर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये अमेरिका तसा प्रस्तावही आणणार आहे. याआधी मसूद अझहरवर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर चीनने नकाराधिकार वापरत मसूद अझहरला वाचवलं होतं.  पण मसूद अझहरची ढाल बनू नका, असा इशारा अमेरिकेने चीनला दिला आहे.

अमेरिका आता चीनला बाजूला ठेवून याबदद्ल फ्रान्स आणि ब्रिटनशी चर्चा करणार आहे. यासंबंधी चीनवर दबाव टाकण्यासाठी एक समिती बनवण्यात येईल, अशीही शक्यता आहे. याआधी मसूद अझहरविरुद्ध आणलेल्या प्रस्तावावर ९ देशांना पाठिंबा दिला होता. पण चीनने आपला नकाराधिकार वापरला. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द झाला.

अमेरिकेचा नवा प्रस्ताव

आता अमेरिकेने ब्रिटन आणि फ्रान्ससोबत जो प्रस्ताव बनवला आहे तो प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या १५ सदस्यांना देण्यात आला आहे, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पाम्पिओ यांनी म्हटलं आहे. असं असलं तरी संयुक्त राष्ट्रांतल्या चिनी अधिकाऱ्यांनी यावर कोणचीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

चीनने अतिरेकी कारवायांना खतपणी घालण्याच्या आरोपाखाली १० लाख मुस्लिमांना सरकारी शिबिरांमध्ये बंदी करून ठेवलं आहे पण दुसरीकडे मात्र मसूद अझहरला दहशतवादी घोषित करायला चीनचा विरोध आहे, ही चीनची भूमिका दुटप्पी आहे, अशी टीका त्यांनी केली.

मसूद अझरवर काय होणार कारवाई ?

मसूद अझहरवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मान्य झाला तर त्याच्या प्रवासावर बंदी येऊ शकते. त्याची संपत्ती जप्त होण्याची कारवाईही होऊ शकते. मसूद अझहरची जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना ISI आणि अल कायदा या संघटनांशी संबंधित आहे. दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत पुरवणं, कट रचणं, शस्त्रास्त्रं पुरवणं असे आरोप या संघटनेवर आहेत.

काश्मीरमधल्या पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधातल्या या लढाईला अनेक देशांनी पाठिंबा दिला. फ्रान्सने तर एक पाऊल पुढे जात मसूद अझहरवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आणला होता पण चीनने मसूद अझहरला वाचवलं होतं.

चीन हा संयुक्त राष्ट्रातल्या सुरक्षा परिषदेचा स्थायी असल्यामुळे चीनला नकाराधिकार आहे. याच नकाराधिकाराचा वापर करून चीनने मसूद अझहरवर बंदी घालण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण केले आहेत.

=============================================================================================================================================================

VIDEO: युतीत ईशान्य 'मुंबई नाट्य' सुरूच; उमेदवारीबाबत सुनील राऊत म्हणाले..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 28, 2019 03:58 PM IST

ताज्या बातम्या