Breaking- अमेरिका म्हणते, भारताने केलेला हल्ला योग्यच

Breaking- अमेरिका म्हणते, भारताने केलेला हल्ला योग्यच

अमेरिकेकडून मिळालेल्या या समर्थनादरम्यान आज गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता केंद्रीय कॅबिनेटची बैठक बोलावण्या आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, २८ फेब्रुवारी २०१९- भारत- पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या तणावादरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक पॉम्पियोशी चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डोवाल यांनी पॉम्पियोशी मध्यरात्री फोनवर चर्चा केली. यानंतर डोवाल म्हणाले की, भारताने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर केलेला हल्ला योग्य असल्याचं अमेरिकेचं मत आहे. अमेरिकेकडून मिळालेल्या या समर्थनादरम्यान आज गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता केंद्रीय कॅबिनेटची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सीमेवर चाललेल्या हालचालींवर चर्चा करण्यात आली.Loading...

भारताच्या पायलटची सुटका होणार? पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचं मोठं विधान

पाकिस्तानची हवाई घुसखोरी

भारतानं एअर स्ट्राईक करत पाक व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केलं. त्यानंतर पाकिस्तानी विमानांनी देखील भारताच्या हद्दीत घुसत आगळीक करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पाकिस्तानचं mi-17 हे विमान भारतानं पाडलं. तर, मिग -27 हे विमान क्रॅश झाल्यानंतर पाकिस्तानच्या हद्दीत उतरलेले विंग कमांडर सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहेत.पाकिस्तानच्या अडचणींत वाढ; अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सचा UNमध्ये महत्त्वाचा प्रस्ताव

अभिनंदन यांची सुटका होणार?

'परिस्थितीतून तोडगा निघावा अशी आमची इच्छा आहे. वातावरण निवळलं की आम्ही ताब्यात घेतलेल्या भारतीय वैमानिकाला सोडण्याचा विचार करू,' असं विधान पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केलं आहे. पाकिस्तानने अभिनंदन वर्थमान या वैमानिकाला बुधवारी ताब्यात घेतलं आहे.


तीनही सेनाध्यक्ष आज पंतप्रधानांना भेटणार, या आहेत आजच्या मोठ्या बातम्या

युएनमध्ये प्रस्ताव

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठा धक्का बसला. कारण, अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सनं संयुक्त राष्ट्रसंघामध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे. शिवाय, जैशचा म्होरक्या अझहर मसूदला देखील आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावे यासाठी प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या या संघटनेसह पाकिस्तानच्या अडचणीमध्ये देखील आता वाढ होताना दिसत आहे.

SPECIAL REPORT : लादेनसारखाच मसूदचा पण होईल का खात्मा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2019 10:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...