VIDEO : पाकच्या पत्रकारांची इज्जत काढल्यानंतर भारतीय पत्रकारांबद्दल ट्रम्प काय म्हणाले?

VIDEO : पाकच्या पत्रकारांची इज्जत काढल्यानंतर भारतीय पत्रकारांबद्दल ट्रम्प काय म्हणाले?

काश्मीर मुद्द्यावरून प्रश्न विचारल्यानंतर पाकिस्तानच्या पत्रकारांची डोनाल्ड ट्रम्प यांनी खिल्ली उडवली होती.

  • Share this:

न्यूयॉर्क, 25 सप्टेंबर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकचे पंतप्रधान इमरान खान यांची सोमवारी भेट झाली होती. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकच्या पत्रकारांची खिल्ली उडवली होती. पाकिस्तानचे पत्रकार ट्रम्प यांना काश्मीरच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारत होते. त्यावर ट्रम्प यांनी पत्रकार प्रश्न विचारत आहेत की सांगत आहेत असं म्हटलं होतं.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. त्यावेळी भारताच्या पत्रकारांची त्यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले की, माझ्याकडे असे पत्रकार हवे होते. मी आतापर्यंत जितके पत्रकार पाहिले त्यामध्ये हे सर्वात चांगले आहे. तुम्हाला हे पत्रकार कुठून मिळाले असंही ट्रम्प यांनी म्हटलं.

भारतीय पत्रकारांची प्रशंसा करण्यापूर्वी ट्रम्प यांनी पाकिस्तानी पत्रकारांची खिल्ली उडवली होती. काश्मीर मुद्द्यावर एकापाठोपाठ एक प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवरून ट्रम्प म्हणाले की, तुम्ही इमरान खान यांच्या गटातील आहात का? तुम्ही प्रश्न विचारत नाही तर तुमचं मत सांगत आहात असं ट्रम्प म्हणाले होते.

पाकिस्तानी पत्रकाराने काश्मीरमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन होत असल्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर ट्रम्प यांनी इमरान खान यांच्याकडे इशारा करत विचारलं की, तुम्हाला असे पत्रकार कुठून मिळतात. यावेळी इमरान खान यांची बोलतीच बंद झाली होती. ट्रम्प यांनी सातत्याने अमेरिकन माध्यमं खोट्या बातम्या देत असल्याचे आरोप केले आहेत.

पुण्यात पावसाचा कहर; कोंढवा येवलेवाडी परिसरात पाणीच पाणी

Published by: Suraj Yadav
First published: September 25, 2019, 12:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading