Elec-widget

ट्रम्प उतावीळ! म्हणाले, भारत-पाक यांच्यात मध्यस्थी करण्यास तयार पण...

ट्रम्प उतावीळ! म्हणाले, भारत-पाक यांच्यात मध्यस्थी करण्यास तयार पण...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाक यांच्यात काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करण्यास तयार असल्याचा पुनरुच्चार केला आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 10 सप्टेंबर : गेल्या दोन आठवड्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी झाला असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. तसेच त्यांनी पुन्हा एकदा म्हटलं की, दक्षिण आशियातील दोन्ही शेजारी देशांची इच्छा असेल तर ते हस्तक्षेप करायला तयार आहे. 26 ऑगस्टला फ्रान्समध्ये झालेल्या जी7 बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांची चर्चा झाली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं होतं की, भारत-पाकिस्तान यांच्यातील प्रश्नावर तिसऱ्या देशानं हस्तक्षेप करण्याची गरज नाही.

सोमवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये पत्रकारांना सांगितलं की, काश्मीर मुद्द्यावरून भारत-पाक यांच्यात तणाव आहे. मला वाटतं की दोन आठवड्यापूर्वी जितका तणाव होता त्यापेक्षा आता कमी आहे.

भारत-पाक यांच्यात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी ट्रम्प यांनी आपण पुढाकार घेऊ असं म्हटलं होतं. त्यांनी पुन्हा एकदा त्यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. ट्रम्प म्हणाले की, मला दोन्ही देशांची साथ पसंत आहे. दोन्ही देशांची इच्छा असेल तर मदत करण्यास तयार आहे. दोन्ही देशांना माहिती आहे की त्यांच्यासमोर मध्यस्थीचा प्रस्ताव आहे.

याआधी जुलै 2019 मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान अमेरिका दौऱ्यावर असताना ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर हस्तक्षेप करण्याचा प्रस्तान ठेवला होता. भारतानं हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. गेल्या महिन्यात फ्रान्समध्ये पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात चर्चा झाली होती. तेव्हा मोदींनी ट्रम्प यांना स्पष्ट सांगितलं होतं की, भारत आणि पाक यांच्यातील मुद्दा द्विपक्षीय आहे त्यावर तिसऱ्या देशानं कोणतीही भूमिका घेण्याची आवश्यकता नाही.

भारतानं काश्मीरमधील 370 कलम हटवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. त्यानंतर पाकच्या पंतप्रधानांनी अण्वस्र हल्ल्याची धमकीही दिली होती. त्यांच्याशिवाय नेते आणि क्रिकेपटूंनीसुद्धा काश्मीर मुद्द्यावर भारतानं चुकीचा निर्णय घेतला असं म्हटलं होतं.

Loading...

VIDEO: वंचित आघाडीबाबत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली 'ही' इच्छा, इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 08:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...