VIDEO : पाकिस्तानात या मुस्लिमांची वाईट अवस्था; वृद्धाच्या कहाणीने ट्रंम्पही थक्क

VIDEO : पाकिस्तानात या मुस्लिमांची वाईट अवस्था; वृद्धाच्या कहाणीने ट्रंम्पही थक्क

अब्दुल शुकूर असं ट्रम्प यांना भेटणाऱ्या मुस्लिम नागरिकाचं नाव आहे. त्याने छळाची कहाणी सांगितली.

  • Share this:

वॉशिंग्टन 18 जुलै : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये विविध देशांमधल्या धार्मिक आधारांवर भेदभाव झालेल्या पीडितांची भेट घेतली. यावेळी पाकिस्तानातल्या काही अहमदी मुस्लिमांचाही समावेश होता. एका 81 वर्षीय अहमदीया मुस्लिम नागरिकाची कहाणी ऐकून अध्यक्ष ट्रम्पही थक्क झाले. अहमदी मुस्लिमांना पाकिस्तानात मुलभूत हक्कही नाकारण्यात आल्याचं त्या नागरिकांनी ट्रम्प यांना सांगितलं.

अब्दुल शुकूर असं ट्रम्प यांना भेटणाऱ्या मुस्लिम नागरिकाचं नाव आहे. त्यांनी सांगितलं की, अहमदीया पंथाच्या मुस्लिमांना पाकिस्तानात 1974मध्ये गैर मुस्लिम घोषीत करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची घरं जाळण्यात आली. त्यांना मुलभूत हक्क नाकारले गेले. त्यांचे उद्योग व्यवसाय संपविण्यात आलेत. अशा परिस्थित ते दुसऱ्या भागात राहायला गेले आणि पुस्तक विक्रिचा व्यवसाय त्यांनी सुरू केला.

SPECIAL REPORT : काँग्रेस-राष्ट्रवादीचे कोण-कोणते आमदार लागले भाजपच्या गळाला?

मात्र तिथेही त्यांना पुस्तक विक्री करू नये म्हणून बंदी घालण्यात आली आणि 6 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर त्यांना कारागृहातही जावं लागलं. तीन वर्षांपूर्वी त्यांची जेलमधून सुटका झाली. त्यांची कहाणी ऐकून ट्रम्प यांनाही धक्काच बसला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे लवकरच अमेरिकेच्या भेटीवर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ऐकलेली ही कहाणी महत्त्वाची घटना समजली जाते. ट्रम्प याबाबत काही मुद्दे इम्रान खान यांच्याकडे उपस्थित करू शकतात.

शिवसेनेचे युवराज जनतेच्या दारी, आदित्य ठाकरे 'अ‍ॅक्शन'मध्ये

Loading...

पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांची पत्रकारांनी काढली लाज

लंडन : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी हे शुक्रवारी लंडनमध्ये एका कार्यक्रमात सहभागी व्हायला गेले, मात्र तिथे त्यांची पत्रकारांनी लाजच काढली त्यामुळे त्यांना अपमानास्पद स्थितीला तोंड द्यावं लागलं. 'माध्यमांचं स्वातंत्र'या विषयावरच्या एका परिसंवादात सहभागी व्हायला कुरेशी हे लंडनमध्ये आले होते. ते कार्यक्रमस्थळी आल्यावर सर्व खुर्च्या रिकाम्याच होत्या. फक्त काही मोजके पत्रकार उपस्थित होते. त्यांनीच प्रश्न विचारून कुरेशी यांना भंडावून सोडलं.

पाकिस्तानात माध्यमांची गळचेपी होत असताना तुम्ही कुठल्या तोंडाने माध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत बोलत आहात असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला. पाकिस्तानी लष्कर माध्यमांवर बंधन आणतं, विरोधी पक्षाच्या नेत्यांना वाईट वागणूक दिली जाते असं असताना तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे का?असा थेट प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला, त्यावेळी त्यांची चांगलीच भंबेरी उडाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 18, 2019 10:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...