डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी मोटेरा स्टेडियमवर उभारण्यात आलेला गेट कोसळला

डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी मोटेरा स्टेडियमवर उभारण्यात आलेला गेट कोसळला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी (24 फेब्रुवारी) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प देखील असणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,23 फेब्रुवारी: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी (24 फेब्रुवारी) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प देखील असणार आहे. अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेला गेट कोसळला आहे. जोरदार हवेमुळे हा गेट कोसळल्याची माहिती मिळत आहे.

मोटेरा स्टेडियमच्या गेट नंबर तीनवर हा तात्पुरता गेट उभारण्यात आला होता. याच गेटमधून डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी प्रवेश करणार होते.

अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. जगात सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम समजले जाणारे मोटेरा स्टेडियममध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मात्र, ट्रम्प यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू असताना मोटेरा स्टेडियममधील गेट कोसळला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालीली नाही.

भारत दौऱ्यामध्ये सोन्या-चांदीच्या ताटात जेवणार डोनाल्ड ट्रम्प

ट्रम्प यांच्यासोबत पत्नी, मुलगी आणि जावईही

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यांची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. कारणही तसेच आहे. डोनाल्ड ट्रम्प हे पत्नी मेलानिया आणि मुलगी इवांका ट्रम्प, जावई जेरेड कुशनर भारत दौऱ्यावर येत आहेत. इवांका ट्रम्पचा हा दुसरा भारत दौरा असणार आहे. याआधी इवांका 2017 मध्ये हैदराबादमधील ग्लोबल बिजनेस समिटमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती.

अतिथी देवो भवो... सोन्या-चांदीच्या ताटात जेवणार डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौऱ्याला अवघा एक दिवस शिल्लक आहे. ट्रम्प यांच्या कुटुंबाचं स्वागत करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच हिरे, रत्न आणि मोत्यांमध्ये देश आणि जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या राजस्थानलाही ट्रम्प भेट देणार आहेत. ट्रम्प यांच्या या दौऱ्यामध्ये राजस्थानची महत्वाची भूमिका बजावणार आहे. राजस्थानच्या अरूण ग्रुपने पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या भारत दौऱ्या दरम्यान त्यांच्या जेवणासाठी खास विशेष लक्झरी सोन्या-चांदीच्या कटलरी आणि टेबलवेयर तयार केले आहेत.

कोरोना व्हायरस: जीव धोक्यात घालून रुग्णांची मदत करतेय गरोदर नर्स, Video Viral

अतिथी देवो भवः या परंपरेला सांभाळत असताना देशी-विदेशी पाहुण्यांचे आदरातिथ्य करत असताना राजस्थानची प्रसिद्ध संस्कृती ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यातही राजस्थानची संस्कृती आपली छाप पाडणार आहे. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात त्यांच्या जेवण आणि ब्रेकफास्टसाठी विशेष भांडी तयार करण्यात आली आहेत. आणि ती चक्क सोन्याचांदीचा आहेत. ही सर्व भांडी राजस्थानच्या अरूण ग्रुपने जयपूरमध्ये तयार केली आहेत. अरूण ग्रुपने याआधीही अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यामध्ये अशाच प्रकारची सोन्या-चांदीची भांडी तयार करण्यात आली होती. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या सोनं आणि चांदीच्या प्लेट्स, कटलरी सेट आणि टेबलवेयर दिल्लीमध्ये ट्रम्प यांच्या लंच आणि डिनरमध्ये पाहायला मिळतील.

25 वर्षापूर्वी अशी दिसायची ही अभिनेत्री, शेअर केला जुना फोटो

अरुण ग्रुपने असा दावा केला आहे की, याच्या आधी अमेरिकेचे माजी राध्यध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यात सुद्धा त्यांनी विशेष कटरी आणि टेबलवेयर तयार केले होते. अरुण ग्रुपने आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या ट्रॉफी निर्मितीसह अनेक चांगल्या उत्पादनांच्या जोरावर जगभरात आपली ओळख बनवली आहे.

First published: February 23, 2020, 4:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading