अलिशान ऑफिस, 100 जणांच किचन, सर्जरी रुम; ट्रम्प यांचं असं आहे Air Force One विमान

अलिशान ऑफिस, 100 जणांच किचन, सर्जरी रुम; ट्रम्प यांचं असं आहे Air Force One विमान

जगातलं सर्वात शक्तिशाली विमान असल्याचं समजलं जातं. अत्याधुनिक संपर्क यंत्रणा आणि तेवढ्याच तोडीची सुरक्षा व्यवस्था आहे.

  • Share this:

मुंबई 24 फेब्रुवारी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं एका खास विमानाने भारतात आगमन झालंय. अध्यक्ष झाल्यानंतरचा ट्रम्प यांचा हा पहिलाच दौरा आहे. अहमदबादमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांनी साबरमती आश्रमला भेट दिली. अमेरिकेचे अध्यक्ष जेव्हा विदेश दौऱ्यांवर असतात तेव्हा ते एका खास विमानाने प्रवास करतात. Air Force One असं त्या विमानाचं नाव असून ते जगातलं सर्वात शक्तिशाली विमान असल्याचं समजलं जातं. अत्याधुनिक संपर्क यंत्रणा आणि तेवढ्याच तोडीची सुरक्षा व्यवस्था असलेलं हे विमान कायम जगभर कुतुहलाचा विषय ठरलं आहे.

बोइंग 747-200बी श्रेणीचं हे विमान असून त्यावर United States Of Amecrica असं लिहिलेलं आहे. जगात कुठल्याही हवामानात उतरण्याची या विमानाची क्षमता आहे. त्याचबरोबर हवेतल्या हवेत इंधन भरण्याचीही त्याची क्षमता आहे. कुठल्याही क्षेपणास्त्राला परतवून लावण्याची व्यवस्था असून संभाव्य धोक्याची कल्पना देण्याची अत्यंत आधुनिक रडार यंत्रणाही त्यावर बसविण्यात आलीय.

विमानात तब्बल 4 हजार स्क्वेअरफुट जागा वापरासाठी उपलब्ध आहे. त्यात अध्यक्षांसाठी अलिशान ऑफिस, काही खोल्या आहेत. त्याचबरोबर पाहुण्यांसाठीही बसण्याची खास व्यवस्था आहे. आणीबाणीच्या काळात याच ऑफिसचा उपयोग वॉर रुम म्हणून करण्याचीही सोय आहे.

विमानात खास सर्जरी रुम असून त्यात कायम दोन डॉक्टर्स तैनात असतात. त्याचबरोबर विमानात दोन किचन्स असून त्यात प्रत्येकी 100 जणांचा स्वयंपाक तयार करता येतो. या विमानात किमान 400 जण एकाच वेळी प्रवास करू शकतात.

First published: February 19, 2020, 4:06 PM IST

ताज्या बातम्या