ISISचा म्हेरक्या बगदादीचा कसा केला खात्मा?, अमेरिकेकडून पहिला VIDEO जारी

ISISचा म्हेरक्या बगदादीचा कसा केला खात्मा?, अमेरिकेकडून पहिला VIDEO जारी

अमेरिकेच्या विशेष फोर्सने नियोजनकरून बगदादीच्या अड्ड्यावर हल्ला केल्याचं ह्या व्हिडिओमधून स्पष्ट होतं आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 31 ऑक्टोबर: अमेरिकेच्या विशेष पथकानं आयएसआयएसचा म्हेरक्या अबु बक्र अल बगदादीचा खात्मा केला आहे. याचा एक व्हिडिओ अमेरिकेच्या विशेष पथकाकडून ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये बगदादीला कशा पद्धतीनं संपवलं याचा ड्रोन चित्रिकरण करण्यात आलं आहे. सुनियोजित पद्धतीनं इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादीचा खात्मा केल्याचं या व्हिडिओमधून दिसत आहे. हे मिशन साधारण दोन तास सुरू होतं.

अमेरिकेकडून ट्विट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?

हा व्हिडिओ ड्रोनच्या सहाय्यानं काढण्यात आला आहे. बगदादी जिथे लपून बसला होता ते घर या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय. या घरावर आधी अमेरिकेच्या लढाऊ विमानातून हल्ला करण्यात आला. याच दरम्यान विशेष सैनिकांच्या पथकानं या घराला घेराव घातला. त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील लोकांना घर सोडून बाहेर येण्याची विनंतीही केली. बगदादी एका बोगद्यात लपून बसला होता. त्याला सैनिकांनी घेरल्यानंतर मुलांसह त्याने स्वत:ला उडवून घेतल्याची माहिती अमेरिकेच्या सैनिकांनी दिली आहे. याच दरम्यान दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. थोड्या वेळाने सैनिकांनी बगदादी ज्या ठिकाणी होता तिथे जाऊन त्याचा डिएनए टेस्ट केला आणि तो मॅच झाल्यानंतरच एफ 15 लढाऊ विमानातून हल्ला करून बगदादी जिथे लपला होता तो परिसर नष्ट करण्यात आला. त्यानंतर अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी बगदादीचा मृतदेह समुद्रात फेकून दिला असल्याचं समोर आलं आहे. याआधी ओसामा बिन-लादेनचा मृतदेहही समुद्रात फेकला होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन लष्कराच्या हल्ल्यात इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबु बक्र अल बगदादीचा खात्मा झाल्याचं रविवारी (27 ऑक्टोबर )रोजी जाहीर केलं. त्याची तीन मुलं आणि अनेक सहकारी मारले गेल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. बगदादी एका बोगद्यात लपून बसला होता. त्याला घेरल्यानंतर मुलांसह त्याने स्वत:ला उडवून घेतलं. तो भित्रा होता आणि कुत्र्यासारखा मेला असं ट्रम्प म्हणाले. जगातील नंबर एकचा दहशतवादी अबु बक्र अल बगदादीला ठार केलं. तो जगातील सर्वात क्रूर आणि हिंसक संघटनेचा संस्थापक आणि प्रमुख होता.

कोण होता बगदादी?

संपूर्ण नाव - अबु बक्र अल बगदादी

आयसिस म्हणजेच इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरियाचा प्रमुख

अल कायदाच्या इराक विभागाचा म्होरक्या होता

16 मे 2010 - अबु ओमर अल बगदादीच्या मृत्यूनंतर आयसिसचा नेता

2 मे 2011 - ओसामा बिन लादेन ठार झाल्यानंतर लादेनची स्तुती करणारं पत्र

सीरियामधल्या यादवीनंतर 8 एप्रिल 2013 ला 'आयसिस'ची स्थापना

2014मध्ये सीरिया आणि इराकमध्ये खलिफ म्हणून घोषित केलं

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

SPECIAL REPORT : मोदींबरोबरच विराट कोहलीही आहे Hit List वर; गुप्तचरांच्या हाती लागली माहिती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2019 09:05 AM IST

ताज्या बातम्या