अमेरिकेसोबतच्या संरक्षण करारानंतर भारताला मिळणार का पाकिस्तानचा सिक्रेट मॅप?

भारत आणि अमेरिकेमध्ये बेसिक एक्स्चेंज अँड कोऑपरेशन अग्रीमेंट (BECA) नुकतंच झालं. या संरक्षण करारातल्या कुठल्या तरतूदीमुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे? वाचा सविस्तर...

भारत आणि अमेरिकेमध्ये बेसिक एक्स्चेंज अँड कोऑपरेशन अग्रीमेंट (BECA) नुकतंच झालं. या संरक्षण करारातल्या कुठल्या तरतूदीमुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे? वाचा सविस्तर...

  • Share this:
    नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर : "भारतीय लष्कर आणि तंत्रज्ञानामुळे दक्षिण आशियातील स्थैर्याला धोका निर्माण झाला आहे. प्रगत तंत्रज्ञानाद्वारे भारत षड्यंत्र रचत आहे",  अशी खदखद पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं (Pakistan) नुकतीच व्यक्त केली. भारताच्या अमेरिकेबरोबरच्या ताज्या संरक्षण कराराने (US India pact) पाकिस्तानचं धाबं दणाणलं आहे आणि ही असली वक्तव्य त्याचीच निदर्शक आहेत. आता चीन सीमेवर (India China border) तणाव सुरू असतानाच या परिस्थितीत भारत आणि अमेरिकेमध्ये संरक्षण करार झाला. या करारामुळे पाकिस्तान खऱ्या अर्थाने बिथरला त्यामागे आहे एक मोठं कारण. भारत आणि अमेरिकेमध्ये बेसिक एक्स्चेंज अँड कोऑपरेशन अग्रीमेंट (BECA) नुकतंच झालं. त्यावर दोन्ही देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी आणि परराष्ट्र मंत्र्यांनी सह्या केल्या. संरक्षण क्षेत्रातल्या या करारानुसार नकाशे, सागरी आणि हवाई चार्ट, व्यावसायिक छायाचित्रं, भौगोलिक परिस्थिती व इतर गोष्टींचा डेटा हा दोन्ही देशांतून एकमेकांना दिला जाणार आहे. या BECA संदर्भातल्या तरतूदीत असंही म्हटलं आहे की, दोन्ही देश सामरिक दृष्ट्या महत्त्वाची माहितीचं आदान-प्रदान करतील.  आता याचा अन्वयार्थ असा की, अमेरिकन मुत्सद्दींनी  त्यांच्या भारत भेटीच्या माध्यमातून चीनला संपूर्णपणे घेरलं आहे. पण या संपूर्ण घटनेमुळे भारताच्या हाती काय लागलं आहे हे जाणून घेऊ या. पाकिस्तानला याबाबत राग का आला? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळचे असलेले आणि अमेरिकेचे गृहसचिव माइक पोम्पीओ यांनी भारत दौऱ्यादरम्यान बीईसीएबद्दल सांगितले की ते केवळ चीनविरुद्ध नव्हे तर सर्व प्रकारच्या धोक्याबद्दल कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत आहेत. यानंतर हे प्रकरण थेट पाकिस्तानशी जोडले गेलं. कारण दक्षिण आशियामध्ये हा देश भारताचा सर्वात मोठा शत्रू आणि चीनच्या तालावर नाचणारं बाहुलं आहे. आता पाकिस्तानला भिती वाटू लागली आहे की अमेरिकेबरोबर भारत आपले मुक्त नकाशे, कागदपत्रं मिळवू शकेल व त्याच्याआधारे भारत पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यास सज्ज असेल. पाकिस्तानी राजकारणी अब्दुल रहमान मलिक यांनी एका अहवालात असं म्हटलं आहे की पाकिस्तानसाठी ही एक गंभीर धोक्याची परिस्थिती आहे. मलिक यांच्या मते उच्च तंत्रज्ञानासह पाकिस्तान आणि चीनवर लक्ष ठेवण्याची ही पद्धत लपून हेरगिरी करण्यासारखी आहे. याबरोबर मलिक यांनी असा दावा केला आहे की चार वर्षांपूर्वीपासून भारतीय उपग्रहाद्वारे भारत आणि अमेरिका पाकिस्तानची हेरगिरी करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आणि त्यानंतर हा उपग्रह हवामानाचा डेटा घेण्यासाठी बनवला गेला होता असं सांगण्यात आलं. मलिक यांनी पाकिस्तानच्या अंतर्गत आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा एक मोठा धोका असल्याचे म्हटले आहे. खरंच पाकिस्तानला धोका आहे का ? वॉशिंग्टन सेंटर फॉर ग्लोबल पॉलिसीने कामरान बुखारी यांच्या हवाल्याने सांगितलं की पाकिस्तानशी संबंधित माहिती भारताला देण्याचा अमेरिकेचा हेतू असणार नाही. या घटनेमुळे अधिकच तणाव निर्माण झाला आहे. यामुळेच अमेरिकन उपग्रहाद्वारे गोळा केलेला पाकिस्तानचा डेटा भारताच्या हाती लागेल की नाही हे निश्चितपणे सांगता येणार नाही. या सर्व घटनेमुळे मलिक यांनी पाकिस्तानच्या वतीने चिंता व्यक्त केली आहे. नाहीतर या परिस्थितीमुळे युद्धजन्य परिस्थिती उद्भवू शकते असंही त्यांनी म्हटले आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published: