Home /News /national /

मोठी बातमी, अमेरिकन कंपनी KKR कडून Jio मध्ये 11,367 कोटींची गुंतवणूक

मोठी बातमी, अमेरिकन कंपनी KKR कडून Jio मध्ये 11,367 कोटींची गुंतवणूक

रिलायन्स जिओमध्ये याआधी फेसबुक, सिल्वर लेक सारख्या कंपन्यांनी भागीदारी केल्यानंतर आणखी एका कंपनीने पुढाकार घेऊन गुंतवणूक केली आहे.

    नवी दिल्ली, 22 मे : रिलायन्स जिओमध्ये याआधी फेसबुक, सिल्वर लेक सारख्या कंपन्यांनी भागीदारी केल्यानंतर आणखी एका कंपनीने पुढाकार घेऊन गुंतवणूक केली आहे. भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिओ (jio) प्लॅटफॉर्म लिमिटेड (Jio Platforms Limited) मध्ये अमेरिकेच्या KKR नावाच्या कंपनीने 11, 367 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. देशातील मोठे डिजिटल सेवा देणाऱ्या टेलिकॉम कंपनीनं यासंदर्भात शुक्रवारी घोषणा केली आहे. KKR कंपनीनं जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 11,367 कोटींची गुंतवणूक करून 2.23 टक्के भागीदारी मिळवली आहे. या कंपनीची ही सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचं सांगण्यात आलं आहे. जिओ प्लॅटफॉर्मचे इक्विटी मूल्य 4.91 लाख कोटी रुपये आणि एंटरप्राइझ मूल्य 5.16 लाख कोटी रुपये आहे. आता या करारामुळे जिओला मागच्या महिन्यात गुंतवणूकीसाठी 78,562 कोटी रुपये मिळाले आहेत. Silver Lake कंपनीकडून 5,655 कोटींची गुंतवणूक अमेरिकेतील मोठी प्रायव्हेट इक्विटी कंपनी सिल्व्हर लेक (Silver Lake) रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म (Reliance Jio) मध्ये गुंतवणूक करणार आहे. या करारानुसार सिल्व्हर लेकने 75 कोटी डॉलर म्हणजेच 5,655.75 कोटींची गुंतवणूक जिओमध्ये करून 1.15 टक्के भागीदारी घेतली आहे. या करारानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजसह भारताला मोठा फायदा होणार आहे. या करारामुळे नवीन उत्पादन क्षमता वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या करारामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) ची टेलीकॉम कंपनी रिलायन्स जिओचे बाजार मूल्य 5.15 लाख कोटी रुपये झाले आहे. याआधी 27 एप्रिल रोजी फेसबुकनं रिलायन्स जिओ इंडस्ट्रीजमध्ये 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची घोषणा करण्यात आली होती. संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Reliance Industries, RlianceJio

    पुढील बातम्या