'...तर अमित शहांवर निर्बंध घाला', अमेरिकन आयोगाची मागणी

'...तर अमित शहांवर निर्बंध घाला', अमेरिकन आयोगाची मागणी

नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेतही मंजूर झाल्यास अमित शहांना आंतरराष्ट्रीय स्तरावर धक्का बसण्याची शक्यता. निर्बंध लादण्याची अमेरिकन आयोगाची मागणी.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : देशात नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असतानाच लोकसभेत 311 मतांनी ते मंजूर कऱण्यात आलं. त्यानंतर आज हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या अमेरिकन आयोगाने या विधेयकावर आक्षेप घेतला आहे. हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निर्बंध घालण्यात यावेत अशी मागणी या आयोगाने केली आहे.

अमेरिकेच्या USCIRF आयोगाने म्हटलं की, नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यास अमेरिकेने अमित शहा आणि इतर प्रमुख नेत्यांवर निर्बंध घालावेत.

दरम्यान, या विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर आसाममध्ये निदर्शने केली जात आहेत. विद्यार्थ्यांकडून विरोध दर्शवताना अनेक ठिकाणी रास्तारोको करण्यात आला आहे. यात काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही घडल्या आहेत. आसाममध्ये या विधेयकाच्या विरोधात 12 तासांचा बंदही पुकारण्यात आला आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयकावर संसदेत सोमवारी वादळी चर्चा झाली. काँग्रेसने आक्रमक धोरण स्वीकारत भाजपवर हल्लाबोल केला. त्यानंतर भाजपचे नेते अमित शहा यांनी उत्तर देत काँग्रेस, शिवसेना आणि तृणमुल काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसचं धर्मनिरक्षेप असं आहे की, केरळमध्ये मुस्लिम लीग काँग्रेससोबत आहे तर महाराष्ट्रात शिवसेना आहे, असं म्हणत शहा यांनी काँग्रेसना टोला लगावला. तसंच मुस्लिमांसोबत कोणताही द्वेष नाही, हे विधेयक येणारच, असा दावाही शहांनी केला.

1951 मध्ये भारतात मुस्लिमांची संख्या 9.8 टक्के होती ती आज 14.23 टक्के झाली आहे. आम्ही कुणासोबत भेदभाव केला नाही. पुढे सुद्धा कोणत्याही धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. बांगलादेशमध्ये 1947 मध्ये अल्पसंख्यांकांची संख्या 22 टक्के होती, ती 2011 मध्ये 7.8 टक्के आहे, मग इतकी लोकं गेली कुठे? असा सवालही शहांनी उपस्थितीत केला.

हे विधेयक लाखो शरणार्थ्यांना तणावपूर्ण आयुष्यातून सुखद दिलासा देणारे ठरणार आहे. या विधेयकामुळे त्यांना नागरिकता मिळण्याचं काम होणार आहे. पंतप्रधान मोदींकडून ही त्यांना भेट दिली जाणार आहे, हे विधेयक येणारच हे आता स्वीकारलंच पाहिजे, असंही अमित शहांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: america
First Published: Dec 10, 2019 11:09 AM IST

ताज्या बातम्या