उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राहुल गांधींनी केले स्वागत!

उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राहुल गांधींनी केले स्वागत!

प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी बुधवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मार्च: प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी बुधवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उर्मिला यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी संजय निरुपम देखील उपस्थित होते.

नवी दिल्लीत रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.

दरम्यान, याआधी उत्तर मुंबई उमेदवारीसाठी उर्मिला मातोंडकर यांच्या नावाचा पक्ष विचार करत असल्याचं संजय निरुपम यांनी म्हटलं होतं. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली होती. त्यानंतरच उर्मिला मातोंडकर यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशाची चर्चा सुरु झाली होती.

उत्तर मुंबई लोकसभा भाजपाकडून या आधीच गोपाळ शेट्टी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात आता काँग्रेस उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चर्चा करत असल्य़ाचं सांगण्यात येत आहे. उर्मिला मातोंडकर यांचा काॅग्रेस प्रवेश करून तिकीट देण्यासाठी काॅग्रेस पक्षाच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचंही सांगण्यात येत आहे. पण याच मतदार संघातून आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारी कोणाला याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सहा भाषेत बोलते धोनीची लेक; पाहा बाप-लेकीचा 'हा' VIDEO

First Published: Mar 27, 2019 02:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading