लोकसभा निकाल 2019 : EVMविरोधात उर्मिला मातोंडकरांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

लोकसभा निकाल 2019 : EVMविरोधात उर्मिला मातोंडकरांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

उर्मिला मातोंडकर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

  • Share this:

मुंबई, 23 मे : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी EVMबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मागाठाणे येथील EVM नंबर आणि सहीमध्ये फरक दिसत असल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी तक्रारीमध्ये म्हटलं आहे. त्याबाबतचं ट्विट देखील त्यांनी केलं आहे.Loading...

गोपाळ शेट्टी 1 लाख 11 हजार मतांनी आघडीवर

दरम्यान, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी विरूद्ध उर्मिला मातोंडकर या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण, विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना उर्मिला मातोंडकर यांनी आव्हान दिलं आहे. पण, सध्या हाती येत असलेले कल पाहता भाजपचे गोपाळ शेट्टी 1 लाख 11 हजार मतांनी आघाडीवर आहेत. 2014मध्ये देखील गोपाळ शेट्टी मोठ्या मताधिक्क्यांनी निवडून आले होते.

राज ठाकरे फॅक्टर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हाही मुंबईच्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करत भाजप सरकारवर जोरदार टीका करत आहेत. याचा फटका भाजपला किती बसेल हे निकालातच कळेल. त्यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीचा मतदानावर किती परिणाम होतो हाही प्रश्न आहे.

पण, आता हाती आलेले कल पाहता गोपाळ शेट्टी यांनी तब्बल 1 लाख मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे निकालाअंती नेमकं कोण, किती मतांनी विजयी होणार हे पाहावं लागणार आहे.


VIDEO : भाजपचा विराट विजय, मोदींनी आईंनी असा दिला आशीर्वाद!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 12:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...