धक्कादायक! Rapistan चा अर्थ Urban Disctionary मध्ये काय दिलाय पाहा; देशाचा केला अवमान!

Urban Dictionary मध्ये rapistan या शब्दाचा काय अर्थ दिलाय हे पाहून मात्र धक्का बसेल. भारतीयांना अपमान वाटेल असा याचा अर्थ आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 8, 2019 06:24 PM IST

धक्कादायक! Rapistan चा अर्थ Urban Disctionary मध्ये काय दिलाय पाहा; देशाचा केला अवमान!

मुंबई, 8 सप्टेंबर : एखादा इंग्रजी शब्द अडला की पटकन google करून त्याचा शब्दकोशात अर्थ शोधला जातो. तुम्हीही यासाठी Urban Dictionary चा ऑनलाईन पर्याय कधी ना कधी वापरलाच असेल. विशेषतः एखादा नव्याने भाषेत प्रचलित झालेला शब्द आणि त्याचा नेमका अर्थ शोधायचा असेल तर अर्बन डिक्शनरीचा वापर केला जातो. या डिक्शनरीमध्ये rapistan या शब्दाचा काय अर्थ दिलाय हे पाहून मात्र धक्का बसेल. भारतीयांना अपमान वाटेल असा याचा अर्थ आहे.

अॅरोल पेकहम यांनी 1999 मध्ये ही संकल्पना सुरू केली. नव्या पिढीची मंडळी बोलीभाषेत वापरतात त्या शब्दांचा, स्लँगचा अर्थ यासाठी अर्बन डिक्शनरीचा वापर केला जातो. डिक्शनरी.कॉम dictionary.com ची नक्कल करण्यासाठी, विडंबनात्मक कल्पनेतून याचा जन्म झाला. पण आता अनेक तरुण मंडळी लेटेस्ट लिंगो म्हणजे आजची भाषा आणि त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी याचा वापर करतात.

आता या Urban Dictionary ने भारत किंवा हिंदुस्तानला काय म्हणून ओळखलं जातं तर Rapistan - रेपिस्तान असं म्हटलं आहे.

निदा मलिक नावाच्या ट्विटर यूजरने (बहुधा पाकिस्तानी) Rapistan म्हणजे काय असं ट्विटरवर विचारल्यावर Urban dictionary ने भारत किंवा हिंदुस्तानचा उल्लेख रेपिस्तान केला जातो, असं ज्ञान पाजळलं आहे.

हे वाचा - चुकून पुरुषांच्या टॉयलेटमध्ये गेली अभिनेत्री, नंतर घडलं असं काही की...

Loading...

या देशात लहान मुलींवरही, अगदी एक वर्षाच्या मुलीवरही बलात्कार होतो. असा देश जिथे गाईंना स्त्रियांपेक्षा जास्त सन्मान आणि सुरक्षा दिली जाते.

अर्णब गोस्वामी रेपिस्तानमध्ये जन्माला आले, अशी मुक्ताफळंही या डिक्शनरीत उधळलेली दिसत आहेत.

तुम्हाला वाटेल ही गंमत आहे किंवा फिरकी घेताहेत, पण तसं नाही. कारण urban dictonary च्या वेबसाईटवही हा असाच अर्थ रेपिस्तान या शब्दापुढे देण्यात आला आहे.

VIDEO: मल्हारी लाहिरे या लष्करी जवानावर अंत्यसंस्कार, मुलाने दिला मुखाग्नी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2019 06:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...