Home /News /national /

पुन्हा लग्न करतेय IAS टीना दाबी, होणाऱ्या मराठमोळ्या पतीसोबत शेअर केला फोटो

पुन्हा लग्न करतेय IAS टीना दाबी, होणाऱ्या मराठमोळ्या पतीसोबत शेअर केला फोटो

IAS आणि UPSC टॉपर असलेली टीना दाबी (IAS and UPSC topper Tina Dabi) पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

  जयपूर, 29 मार्च: राजस्थान केडरची (Rajasthan cadre's) 2016 बॅचची IAS आणि UPSC टॉपर असलेली टीना दाबी (IAS and UPSC topper Tina Dabi) पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. टीना दाबीची भावी जोडीदारही आयएएस आहे. प्रदीप गावंडे असे त्याचे नाव असून तो २०१३ च्या बॅचचा आयएएस आहे. दोघांनीही त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एकत्र फोटो शेअर केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघे 22 एप्रिलला जयपूरमधील एका खासगी हॉटेलमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. आयएएस टीना दाबीने यापूर्वी 2018 मध्ये अतहर खानशी लग्न केलं होतं. हे लग्न दोन वर्षांहून अधिक काळ टिकलं नाही आणि दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. आता टीना दाबीचा होणारा दुसरा पती प्रदीप यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. प्रदीप हा चुरू जिल्ह्याचा कलेक्टरही आहे. यूपीएससी करण्यापूर्वी त्यांनी एमबीबीएस केलं होतं.
  View this post on Instagram

  A post shared by Tina Dabi (@dabi_tina)

  टीना दाबी आणि प्रदीपने इंस्टाग्रामवर एकत्र फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये टीनाने लिहिले आहे की, 'तुम्ही मला जे हसू देत आहात ते मी आज परिधान करत आहे.' कॅप्शनसोबत Fiance असा हॅशटॅग लिहिला आहे. दोघांनी लाल रंगाचे कपडे घातलेले दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदिव गावंडे यांचंही हे दुसरे लग्न आहे. यूपीएससीमध्ये टॉपर असलेल्या टीना दाबीनं त्याच वर्षी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अतहर खानसोबत लग्न करून चर्चेत आली होती. ट्रेनिंगदरम्यान दोघांमधील प्रेम वाढलं. यानंतर दोघांनी एकमेकांना डेट केलं होतं आणि त्यानंतर 2018 साली दोघांनी लग्न केल होतं.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Ias officer, Upsc

  पुढील बातम्या