मराठी बातम्या /बातम्या /देश /'सारथी'च्या विद्यार्थ्यांनी जंतरमंतरवर परीक्षेचा अभ्यास करून महाराष्ट्र सरकारचा निषेध

'सारथी'च्या विद्यार्थ्यांनी जंतरमंतरवर परीक्षेचा अभ्यास करून महाराष्ट्र सरकारचा निषेध

'सारथी' योजनेअंतर्गत  दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील 285 विद्यार्थ्यांचे विद्यावेतन जानेवारी महिन्यापासून थकले आहे.

'सारथी' योजनेअंतर्गत दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील 285 विद्यार्थ्यांचे विद्यावेतन जानेवारी महिन्यापासून थकले आहे.

'सारथी' योजनेअंतर्गत दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील 285 विद्यार्थ्यांचे विद्यावेतन जानेवारी महिन्यापासून थकले आहे.

नवी दिल्ली,17 फेब्रुवारी: 'सारथी' योजनेअंतर्गत दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील 285 विद्यार्थ्यांचे विद्यावेतन जानेवारी महिन्यापासून थकले आहे. याविरोधात सोमवारी जंतरमंतर परिसरात केंद्रीय लोकसेवा आयोजगाच्या परीक्षेचा अभ्यास करून या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सरकारचा निषेध व्यक्त केला. राज्यसभा सदस्य खासदार संभाजीराजे भोसले तसेच शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आ.विनायक मेटे यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्याच्या बहुजन विकास मंत्रालयाचे मंत्री विजय वड्डेटीवार यांची विद्यार्थ्यांसोबत दूरध्वनीवर चर्चा घडवून आणली. 'सारथी' संबंधीच्या सर्व समस्या येत्या तीन दिवसांत मार्गी लावू, असे आश्वासन फोनवरून मंत्री विजय वड्डेटीवार यांनी आंदोलकांना दिले.

यूपीएससीच्या तयारीसाठी राज्य सरकारच्या सारथी मार्फत निवड प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. दिल्लीत राहून परिक्षेची तयारी करण्यासाठी सरकारतर्फे विद्यार्थ्यांना पंधरा महिन्यांसाठी दरमहा 13 हजार रूपये विद्यावेतन दिले जाते. मात्र, जानेवारी महिन्याचे विद्यावेतन एक तारखेला मिळणे अपेक्षित असताना ते अद्याप मिळाले नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले होते. यूपीएससीची पूर्व परीक्षा 31 मे रोजी होणार आहे. मात्र, परीक्षेची तयारी करायची की रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे? असा प्रश्न आता विद्यार्थ्यांना पडला आहे. दिल्लीत अभ्यासासाठी आलो आहोत की विद्यावेतनासाठी संघर्ष करण्यासाठी असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी यानिमित्त उपस्थित केले. शेतकरी कुटुंबातून आल्याने घरची परिस्थिती बेताची आहे. जानेवारी महिन्यातील विद्यावेतन थकल्यामुळे घरभाडे, अभ्यासिका, खानावळीचे पैसे कसे द्यायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कुटुंबीय पूर्णत: शेतीवर अवलंबून आहे. घरी त्यामुळे पैसे मागू शकत नाही.

तातडीने विद्यावेतन मिळावे - छत्रपती संभाजीराजे

सारथी संस्थेमध्ये काही गैरव्यवहार झाला असेल त्याची महाराष्ट्र सरकारने जरूर चौकशी करावी. मात्र, विद्यार्थ्यांचे विद्यावेतन रोखणे अतिशय चुकीचे आहे. विद्यार्थ्यांना मिळणारे विद्यावेतन अतिशय तुटपुंजे आहे. मात्र, ते विद्यावेतन देण्यासाठीही नियम, अटी लावल्या जात असतील तर विद्यार्थी दिल्लीत कसे जगणार? असा प्रश्न खासदार संभाजीराजे यांनी उपस्थित केला.

विनायक मेटे यांची मंत्र्यांशी चर्चा

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या समजून घेतल्यानंतर महाराष्ट्राचे मंत्री विजय वडेट्टीवर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी वडेट्टीवार यांनी तीन दिवसांत विद्यावेतन जमा करण्याचे आश्वासन दिले. तसेच, दिल्लीत येऊन सारथीच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करणार असल्याचेही सांगितले.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस

सारथी संस्थेच्या विद्यार्थ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांचे निवेदन मला प्राप्त झाले असून, विद्यावेतन मिळत नसल्याने त्यांना दैनंदिन खर्च भागविणे अवघड झाले आहे. अभ्यास सोडून या विद्यार्थ्यांना पैशाचा तकादा लावणार्‍यांना तोंड द्यावे लागत आहे. सारथीबाबत होत असलेल्या उलटसुलट चर्चा, विद्यावेतनाची हमी यासह अनेक मागण्या त्यांनी केल्या आहेत. सुमारे 300 हून अधिक विद्यार्थ्यांच्या या मागण्यांचा राज्य सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने या समस्या निकाली काढण्यात याव्यात.

First published:
top videos

    Tags: Delhi, Delhi news, Student, Upsc exam