मराठी बातम्या /बातम्या /देश /

UPSC पूर्व परीक्षा पुढं ढकलली, आता 10 ऑक्टोबरला होणार परीक्षा

UPSC पूर्व परीक्षा पुढं ढकलली, आता 10 ऑक्टोबरला होणार परीक्षा

नागरी सेवा पूर्व परीक्षा (UPSC) 2021 पुढे ढकलली आहे. ही परीक्षा 27 जूनला होणार होती. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग (Corona Infection) पाहता परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 13 मे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा पूर्व परीक्षा (UPSC) 2021 पुढे ढकलली आहे. ही परीक्षा 27 जूनला होणार होती. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग (Corona Infection) पाहता परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला आहे. आता ही परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. यासाठी UPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यूपीएससी (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2021 आणि भारतीय वन सेवा परीक्षा 2021 चे अर्ज 24 मार्चपर्यंत घेण्यात आले होते.

दरवर्षी पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तीन टप्प्यात आयोगातर्फे नागरी सेवा परीक्षा घेतली जाते. यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलीस सेवासाठी (आयपीएस) अधिकारी निवडले जातात. यूपीएससीने एक निवेदन जारी करत केंद्रीय लोकसेवा आयोगाने कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 27 जून 2021 ला होणाऱ्या नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2021 पुढे ढकलली आहे, असे सांगितले असून आता ही परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे, असे कळवले आहे.

हे वाचा - ठाण्यात गुंडांचा हैदोस; फिल्मी स्टाईलने पाठलाग करत तरुणावर जीवघेणा हल्ला, घटना CCTVत कैद

आता यावर परीक्षार्थींची काय प्रतिक्रिया येते ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे. महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे मोठा गोंधळ झाला होता, विद्यार्थ्यांनी आंदोलन करत महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले होते. राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. वारंवार परीक्षा पुढे ढकलल्या जात असल्याने वर्षानुवर्ष या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

हे वाचा - नक्की कोणावर होणार कारवाई? श्वेता-अभिनवमधील वादात महिला आयोगाची एण्ट्री

पूर्व परीक्षेमध्ये दोन पेपर वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील. या परीक्षेतील गुण अंतिम गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट होणार नाहीत. यूपीएससी (Civil Services Prelim examination 2021) मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून मिळवलेली पदवी असणे आवश्यक आहे.

First published:

Tags: Upsc, Upsc exam