मराठी बातम्या /बातम्या /देश /UPSC च्या परीक्षेत यशस्वी झालेल्या 32 पैकी 18 जण JNU चे विद्यार्थी; टॉपरही JNU चाच

UPSC च्या परीक्षेत यशस्वी झालेल्या 32 पैकी 18 जण JNU चे विद्यार्थी; टॉपरही JNU चाच

लोकसेवा आयोगाने घेतलेल्या इंडियन इकॉनॉमिक्स सर्विसेस परीक्षा 2019 चे निकाल जाहीर झाले आहेत. एकूण 32 जागांसाठी ही परीक्षा देशभर घेण्यात आली होती.

लोकसेवा आयोगाने घेतलेल्या इंडियन इकॉनॉमिक्स सर्विसेस परीक्षा 2019 चे निकाल जाहीर झाले आहेत. एकूण 32 जागांसाठी ही परीक्षा देशभर घेण्यात आली होती.

लोकसेवा आयोगाने घेतलेल्या इंडियन इकॉनॉमिक्स सर्विसेस परीक्षा 2019 चे निकाल जाहीर झाले आहेत. एकूण 32 जागांसाठी ही परीक्षा देशभर घेण्यात आली होती.

नवी दिल्ली, 13 जानेवारी : लोकसेवा आयोगाने घेतलेल्या इंडियन इकॉनॉमिक्स सर्विसेस परीक्षा 2019 चे निकाल जाहीर झाले आहेत. एकूण 32 जागांसाठी ही परीक्षा देशभर घेण्यात आली होती. यामध्ये निवड झालेल्या अंतिम 32 पैकी 18 विद्यार्थी जेएनयू मधील आहेत. गेल्या काही दिवसांपासून हिसांचाराच्या घटनांमुळे जेएनयू विद्यापीठ चर्चेत आहे. यातच युपीएससीने IES चा निकाल जाहीर केला. यामध्ये 50 टक्क्यांहून अधिक जागांवर जेएनयुच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

इंडियन इकॉनॉमिक्स सर्विसेसमध्ये टॉपर असलेला विद्यार्थीसुद्धा जेएनयुमधील आहे. अंशुमान कामिला असं त्याचं नाव असून त्याने जेएनयूमधून शिक्षण घेतलं आहे. ओडिसाचा असलेला अंशुमन सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत आहे. त्याने दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली. त्यानंतर जेएनयुमधून एम.फिल पूर्ण केले आहे.

UPSC IES final result 2019: असा पाहा

upsc.gov.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येतो. या संकेतस्थळावर गेल्यानंतर "What’s New" पर्यायावर क्लिक करा. त्याठिकाणी "Indian Economic Service 2019"  असं दिसेल. या लिंकवर क्लिक करताच एक पीडीएफ फाइल डाऊनलोड होईल. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांची यादी असेल.

काय झालं होतं जेएनयू मध्ये?

JNU विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या साबरमती वसतिगृहाच्या टी पॉइंटवर छात्रसंघाकडून सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. य़ाच वेळी 40 ते 50 तरुण रुमालाने चेहरा लपवलेले गुंड विद्यापीठाच्या परिसरात घुसले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण सुरू केली. हाताला मिळणारं सामान उचलून त्यांनी तोडफोड केली. समानाचं नुकसान केलं. लोखंडी रॉडने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली आणि तरुण पसार झाले. दरम्यान या घटनेनंतर अभविप आणि डाव्या संघटनांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते.

JNU हल्ला : चेहरा झाकून आलेल्या 'त्या' मुलीची अखेर क्राईम ब्रांचला ओळख पटली

First published:

Tags: JNU