यूपीएससी परीक्षेत नापास होऊनही तो फिरत होता आयजी बनून

यूपीएससी परीक्षेत नापास होऊनही तो फिरत होता आयजी बनून

यूपीएससी परीक्षेत नापास होऊनही आयजी बनून फिरणाऱ्या एका इसमाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे बनावट ओळखपत्रंही सापडली आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 जून : यूपीएससी परीक्षेत नापास होऊनही आयजी बनून फिरणाऱ्या एका इसमाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. राजीव गुप्ता असं त्याचं नाव असून तो गाझियाबादचा राहणार आहे.राजीव गुप्ताने 1989 मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली होती. पण तो या परीक्षेत उत्तीर्ण झाला नाही. तरीही तो सुमारे 30 वर्षं आयजी म्हणजेच पोलीस महानिरीक्षक बनून तामिळनाडूमध्ये फिरत होता.

बनावट ओळखपत्र

राजीव गुप्ता सगळ्यांना तो आयजी असल्याचं सांगत होता. एवढंच नव्हे तर त्याच्याकडे आयजी असल्याचं बनावट ओळखपत्रही होतं. त्या ओळखपत्रावर कॅडर 1089 असं लिहिलेलं होतं. हेच कार्ड दाखवून लोकांना धमकावल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याच्याविरुद्धच्या एका तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी राजीव गुप्ताला अटक केली.

पाइपचं दुकान चालवतो राजीव

हा राजीव गुप्ता पाइपचं दुकान चालवत होता पण बनाव मात्र करत होता आयजी असल्याचा. आयजी बनून राजीवने काही लोकांची फसवणूक केली आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांना राजीवकडे तीन ओळखपत्रं सापडली. ही तिन्ही ओळखपत्रं तामिळनाडू पोलीस खात्याची आहेत आणि ही सगळी ओळखपत्रं बनावट असल्याचा पोलिसांना संशय आहे.

मित्र पुढे गेले म्हणून...

राजीवच्या चौकशीत त्याने सांगितलं की तो यूपीएससी परीक्षेत नापास झाला होता. पण त्याच्या बरोबरीचे मित्र मात्र पास झाले आणि आयजी पदापर्यंत पोहोचले. या कारणामुळेच त्यानेही आपण आयजी असल्याची बतावणी केली. राजीव गुप्ताने या बनावट ओळखपत्रांवर थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 30 वर्षं लोकांची फसवणूक केली. दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केल्यामुळे हे सगळं प्रकरण उघडकीला आलं.

======================================================================================

शपथविधीनंतर अरविंद सावंत यांचं मुंबईत जंगी स्वागत, या आणि इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: June 1, 2019, 3:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading