नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : UPSC परीक्षेत मेहनत आणि चिकाटी खूप महत्त्वाची असते. जेव्हा एका मजुरानं UPSCची परीक्षा पास केली तेव्हा सर्वजण आश्चर्यचकीत झाले. गरिबी आणि हालाकीच्या परिस्थितीवर मात करून IAS झालेल्या अशाच एका धाडसी आणि मेहनती अधिकाऱ्याची संघर्षगाथा जाणून घेणार आहोत.
आयुष्यात प्रत्येक वगळणावर आव्हानं आणि संकटांचा सामना करावा लागतो. अशा स्थितीतही आपल्या असणाऱ्या परिस्थितीवर मात करून अधिकारी होण्याचं स्वप्न मनोज कुमार रॉय यांनी साकार केलं आहे. बिहारच्या एका छोट्याशा गावात मनोज राहतात. एकेकाळी बालवयातही त्यांनी मोलमजुरीची कामं केली होती. आपल्याला आयुष्य रडत नाही तर समाजाची सेवा करत पण चांगलं काढायचं आहे हे मनाशी पक्क होतं. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं हे IAS होऊ शक्य आहे त्यामुळे मनोज यांनी UPSC देण्याचा निर्णय घेतला.
UPSCसाठी मनोज बिहारहून दिल्लीला आले. कोचिंग क्लास आणि इतर खर्चात घरातून आणलेले पैसे संपले. आता पुन्हा सतत घरी मागणंही शक्य नव्हतं. अशावेळी पैसे उभे करण्यासाठी मनोज यांनी दिल्लीत छोटी-मोठी कामं सुरू केली. सुरुवातील अंडी विकायचे, त्यालाच जोड म्हणून मग भाजी देखील विकायला सुरुवात केली. त्यातून येणाऱ्या पैशांमधून खर्च भागवू लागले. त्यानंतर कार्यालयांमध्ये झाडू-पोछा- शिपायाची कामं करण्यास सुरुवात केली.
या सगळ्यातून शिकता येईल तेवढं हार मानता आणि जिद्द न सोडता शिकायचं. ही मेहनत कामी येईल हे त्यांनी मनाशी पक्क ठरवलं होतं. त्यांनी परीक्षा दिली मात्र पहिले तीन प्रयत्न अपयशच हाती आलं. तरीही हार न मानता पुन्हा एकदा 2010 रोजी मनोज यांनी परीक्षा दिली आणि त्यांना यश मिळालं. 870 वा क्रमांक मिळवून ते IAS झाले.
गरिबी आणि IAS पर्यंतचा संघर्ष यातून त्यांनी इतर विद्यार्थ्यांची परवड होऊ नये म्हणू फ्री कोचिंग क्लासेस चालू केले. सुट्ट्यांमध्ये किंवा शनिवार रविवार मनोज गरजू आणि UPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांना विना फी शिकवतात. आपलं काम सांभाळून त्यांना मार्गदर्शन करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.