सवर्णांना मिळणार 10 टक्के आरक्षण, विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

गरीब सर्वणांना 10 टक्के आरक्षण देणाऱ्या विधेयकाला लोकसभे पाठोपाठ राज्यसभेतही मंजुरी मिळाली होती

News18 Lokmat | Updated On: Jan 12, 2019 07:31 PM IST

सवर्णांना मिळणार 10 टक्के आरक्षण, विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

नवी दिल्ली, 12 जानेवारी :  गरीब सर्वणांना 10 टक्के आरक्षण मिळण्याचा पूर्णपणे मार्ग मोकळा झाला आहे. आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देण्याऱ्या विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता हे विधेयक कायद्यात रुपांतरीत होणार आहे.

गरीब सर्वणांना 10 टक्के आरक्षण देणाऱ्या विधेयकाला  लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही मंजुरी मिळाली होती. लोकसभेत  323 मतांनी हे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झालं. फक्त तीन खासदारांनी त्याला विरोध केला. मतदानाच्यावेळी पंतपप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित होते. त्यानंतर  बुधवारी हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आलं होतं. विधेयकाच्या बाजूने 165 तर विरोधात 7 मतं पडली. दोनही सभागृहात हे विधेयक मंजूर झाल्याने हे विधेयक राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवलं होतं. त्यावर आज राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. आता हा कायदा प्रत्यक्षात येणार आहे.

दरम्यान, खुल्या गटातल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटाला 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे.  'युथ फॉर इक्वेलिटी' या संस्थेच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. सोमवारी केंद्र सरकारनं हा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. मंगळवारी चर्चेनंतर लोकसभेनं तर बुधवारी राज्यसभेनं या कायद्याला बहुमताने मंजुरी दिली होती. कोर्टात हा निर्णय टिकेल का याची आता चर्चा सुरू झाली आहे.

====================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 12, 2019 07:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close