मराठी बातम्या /बातम्या /देश /

आता UKमध्येही सुरू होणार UPI सेवा! हजारो भारतीय विद्यार्थी आणि पर्यटकांना होणार फायदा

आता UKमध्येही सुरू होणार UPI सेवा! हजारो भारतीय विद्यार्थी आणि पर्यटकांना होणार फायदा

यूपीआय पेमेंट सर्व्हिसचे देशातील यश पाहून काही दिवसांपूर्वी नेपाळमध्येही यूपीआय सुरू करण्यात आले होते. यानंतर आता युनायटेड किंगडममध्येही यूपीआय सुरू करण्यात आले आहे.

यूपीआय पेमेंट सर्व्हिसचे देशातील यश पाहून काही दिवसांपूर्वी नेपाळमध्येही यूपीआय सुरू करण्यात आले होते. यानंतर आता युनायटेड किंगडममध्येही यूपीआय सुरू करण्यात आले आहे.

यूपीआय पेमेंट सर्व्हिसचे देशातील यश पाहून काही दिवसांपूर्वी नेपाळमध्येही यूपीआय सुरू करण्यात आले होते. यानंतर आता युनायटेड किंगडममध्येही यूपीआय सुरू करण्यात आले आहे.

मुंबई, 19 ऑगस्ट: यूपीआयच्या माध्यमातून भारतात डिजिटल इंडिया अभियानाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये यूपीआय आयडी किंवा कोड स्कॅन करण्याच्या माध्यमातून लोक एकमेकांना पैसे पाठवू शकत आहेत. भारतात ही सेवा एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली आहे, की अगदी भाजीवाल्यापासून ते गाड्यांच्या शोरूमपर्यंत यूपीआय पेमेंट स्वीकारले जात आहे. यामुळे लोक चक्क घरातून निघताना खिशात पैसे आहेत की नाही हे तपासणं देखील विसरले आहेत. कारण तुमचा मोबाईलच यूपीआय पेमेंट करण्यासाठी पुरेसा आहे. भारतातील या यशानंतर आता ब्रिटनमध्येही यूपीआय  सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा तेथील हजारो भारतीयांना आणि पर्यटकांना फायदा होणार आहे. यूपीआय पेमेंट सर्व्हिसचे देशातील यश पाहून काही दिवसांपूर्वी नेपाळमध्येही यूपीआय सुरू करण्यात आले होते. यानंतर आता युनायटेड किंगडममध्येही यूपीआय सुरू करण्यात आले आहे. यासाठी इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेडने ब्रिटनमधील पेमेंट सोल्यूशन प्रोव्हाईडर असणाऱ्या पेएक्सपर्ट कंपनीशी करार केला आहे. एनआयपीएल ही यूपीआय़ सर्व्हिस चालवणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्परेशन ऑफ इंडियाचीच सहाय्यक कंपनी आहे. याच कंपनीने यूपीआय आणि ‘रुपे’ची निर्मिती केली आहे. न्यूजबाईट्स या वेबसाईटने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हेही वाचा - 200 MP चा कॅमेरा, मिनिटांमध्येच होणार चार्ज, लवकरच लॉन्च होणार जबरदस्त Smartphone
 
कुठे उपलब्ध असेल सेवा सुरुवातीला ही सेवा ब्रिटनमधील केवळ त्याच दुकानांमध्ये उपलब्ध होणार आहे ज्या ठिकाणी ‘पेएक्सपर्ट’चे अँड्रॉईड पॉइंट आणि सेल डिव्हाईसेस उपलब्ध असतील. पहिल्या टप्प्यात केवळ यूपीआय आधारित क्यूआर कोड पेमेंट सुविधा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यात रुपे कार्डच्या माध्यमातून पेमेंट सुविधा सुरू केली जाऊ शकते. यूपीआय म्हणजे काय? मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन पैशांचे व्यवहार करण्यात यूपीआयचा मोठा वाटा आहे. एनपीसीआयने सर्वात पहिल्यांदा देशात यूपीआय सुरू करण्याचा विचार मांडला होता. ही संस्था देशातील ऑनलाईन व्यवहारांवर लक्ष ठेवते. यूपीआयमध्ये प्रत्येक वेळी ओटीपी जनरेट होण्याऐवजी वापरकर्त्याने रजिस्ट्रेशनच्या वेळी नेमलेल्या एका पिनचा वापर केला जातो. दुसऱ्या व्यक्तीला यूपीआय आयडीच्या माध्यमातून किंवा क्यूआर कोडच्या माध्यमातून पैसे पाठवता येतात. देशात सध्या व्यक्ती ते व्यक्ती, आणि व्यक्ती ते व्यापारी अशा दोन प्रकारच्या व्यवहारांसाठी यूपीआयचा वापर होतो. यूपीआय किती लोकप्रिय? सन 2021 मध्ये भारतात यूपीआय सर्व्हिसच्या माध्यमातून तब्बल 39 अब्ज रुपयांचे व्यवहार पार पडले होते. तर 2022च्या केवळ जुलै महिन्यात सहा बिलियन वेळा यूपीआय व्यवहार पार पडले. 2016 नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने व्यवहार झाल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करत दिली होती. डिजिटायझेशनच्या प्रयत्नाला मिळालेल्या यशाचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीतारामन यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देऊन केलं होतं. दरम्यान आता यूकेमध्ये देखील यूपीआय सेवा सुरू झाल्यामुळे तेथील हजारो भारतीय विद्यार्थ्यांना, तसेच पर्यटनासाठी तेथे जाणाऱ्या भारतीयांना याचा भरपूर फायदा होणार आहे.
First published:

Tags: Upi

पुढील बातम्या