भापजला धक्का, एनडीएला सोडचिठ्ठी देऊन हा नेता काँग्रेसमध्ये दाखल

भापजला धक्का, एनडीएला सोडचिठ्ठी देऊन हा नेता काँग्रेसमध्ये दाखल

एनडीएला सोडचिठ्ठी देऊन उपेंद्र कुशवाह काँग्रेसमध्ये दाखल झाले आहे.

  • Share this:

20 डिसेंबर : पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेसने आणखी एक धक्का दिला आहे. एनडीएला सोडचिठ्ठी देऊन उपेंद्र कुशवाह काँग्रेसमध्ये दाखल झाले आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या नेत्यांनी कुशवाह काँग्रेसमध्ये दाखल झाल्याची घोषणा केली आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचा मित्र पक्ष राहिलेल्या राष्ट्रीय लोक समता पार्टी (रालोसपा) चे सर्वेसर्वा उपेद्र कुशवाहा यांनी विरोधकांच्या महाआघाडीत सामिल होण्याचा निर्णय घेतला होता. अलीकडे त्यांनी आपण एनडीएमधून बाहेर पडत असल्याची घोषणाही केली होती.

आज नवी दिल्लीत काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन कुशवाहा महाआघाडीत सहभागी झाले असल्याची घोषणा केली आहे.

एनडीएकडून जागावाटपांचा घोळ कायम सुरू होता. पण त्यांनी कोणताही निर्णय दिला नाही. त्यामुळे मला बिहारसाठी काम करायचं आहे असं कुशवाह यांनी सांगितलं.

आमची लढाईही राज्य घटना वाचवण्यासाठी आहे. सीबीआय असो, रिझर्व्ह बँक असो, शेतकरी असो यांना वाचवण्यासाठी आमची लढाई आहे. पंतप्रधान मोदींची देशात हुकुमशाही सुरू आहे. देशात अघोषित आणीबाणी लागू झाली आहे अशी टीका यावेळी तेजस्वी यादव यांनी केली.

Loading...

निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात मोदी हे बिहारमध्ये आले होते तेव्हा त्यांनी निधी देण्याची घोषणा केली होती.आज बिहारची जनता त्यांना याचा हिशेब मागत आहे. मोदींनी बिहारला फक्त लुटण्याचं काम केलं आहे अशी टीकाही तेजस्वी यादव यांनी केली. मोदींनी बिहारला विशेष राज्याचा दर्जा दिला नाही. बिहारचा विकास झाला तर देशाचा विकास होईल. बिहारच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत असं यादव यांनी स्पष्ट केलं.

पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे असं सांगत तेजस्वी यादव यांनी राहुल गांधी यांचं आभार मानले.

===================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2018 04:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...