Forbes List: जगातले 13वे श्रीमंत व्यक्ती झाले मुकेश अंबानी, जाणून घ्या कोण आहे नंबर 1?

अॅमेझाॅनचे जेफ बेजोस पहिल्या नंबरवर आहेत तर मुकेश अंबानी 13 व्या स्थानावर. यादीत बिल गेट्स दुसऱ्या स्थानावर आणि वारेन बफे तिसऱ्या स्थानावर आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 6, 2019 07:42 PM IST

Forbes List: जगातले 13वे श्रीमंत व्यक्ती झाले मुकेश अंबानी, जाणून घ्या कोण आहे नंबर 1?

मुंबई, 06 मार्च : फोर्ब्सच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी 13व्या स्थानावर आहेत. अॅमेझाॅनचे जेफ बेजोस पहिल्या नंबरवर आहेत तर मुकेश अंबानी 13 व्या स्थानावर. यादीत बिल गेट्स दुसऱ्या स्थानावर आणि वारेन बफे तिसऱ्या स्थानावर आहेत.

बेजोस यांची संपत्ती गेल्या वर्षी 19 अब्ज डाॅलर होती. यावर्षी ती 131 अब्ज डाॅलर आहे. मुकेश अंबानी ( 61 वर्ष ) यांची संपत्ती 2018मध्ये 40.1 अब्ज डाॅलर होती. आता ती 50 अब्ज डाॅलर झालीय. गेल्या वर्षी अंबानी 19व्या स्थानावर होते. यावर्षी 6 स्थान वर चढलेत. आता ते 13व्या नंबरवर आहेत. अनिल अंबानी या यादीत 1349स्थानावर आहेत.

याआधी 2017मध्ये फोर्ब्सनं प्रसिद्ध केलेल्या यादीत मुकेश अंबानी 33व्या स्थानावर होते. 106 भारतीय श्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी सर्वात पुढे आहेत. विप्रोचे चेअरमन अजिम प्रेमजी 22.6 अब्ज डाॅलर संपत्तीनं 36व्या स्थानावर आहेत. एचसीएलचे सह संस्थापक शिव नाडर 82व्या स्थानावर आणि आर्सेलर मित्तलचे चेअरमन आणि सीईओ लक्ष्मी मित्तल 91व्या स्थानावर आहेत. हे सगळे जगातल्या 100 श्रीमंत लोकांमध्ये आहेत.

या यादीत आदित्य बिर्ला समुहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला ( 122 ), अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक गौतम अदानी ( 167 ), भारती एअरटेलचे प्रमुख सुनील मित्तल ( 244 ), पतंजलीचे सह संस्थापक आचार्य बालकृष्ण ( 365 ), पिरामल एंटरप्रायजेसचे अध्यक्ष अजय पिरामल ( 436 ), बायोकाॅनचे संस्थापक किरण मुजूमदार ( 617 ), इंफोसिसचे सह संस्थापक एन आर नारायणमूर्ती ( 962 ) आणि आरकाॅमचे चेअरमन अनिल अंबानी ( 1349 ) यांची नावं आहेत.

या यादीत फेसबुकचे मार्क झुकरबर्ग तीन स्थान खाली आहेत, तर न्यूयाॅर्कचे माजी महापौर मायकल ब्लूमबर्ग दुसऱ्या स्थानावर आलेत. यात म्हटलंय की बिल गेट्सची संपत्ती गेल्या वर्षी 90 अब्ज डाॅलरवरून 96.5 अब्ज डाॅलर्स झाली. फोर्ब्सनं लिहिलंय, मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. 2017मध्ये त्यांना 'ग्लोबल गेम चेंजर’चा दर्जा दिला होता. झुकरबर्ग 8व्या स्थानावर आलेत.

Loading...

फोर्ब्सच्या 33व्या वर्षी रँकिंगच्या यादीत 2153 अब्जाधीश होते. 2018मध्ये यात 2208 लोकांची नावं होती. यावर्षी अब्जाधीशांची एकण संपत्ती 8,700 अब्ज डाॅलर्स आहे, गेल्या वर्षी ती 9,100 अब्ज डाॅलर्स झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2019 07:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...