S M L

भारताने धुडकावली ऑफर, मोदींचं विमान पाकिस्तानच्या हद्दीतून जाणार नाही

पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केला असता तर भारताची कडक भूमिका मवाळ झाली असा संदेश गेला असता. त्यामुळे भारताने हा निर्णय घेतलाय.

News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2019 02:58 PM IST

भारताने धुडकावली ऑफर, मोदींचं विमान पाकिस्तानच्या हद्दीतून जाणार नाही

नवी दिल्ली 12 जून : किरगिझस्तानमधल्या बिश्केकमध्ये शांघाय को- ऑपरेशन ऑर्गनायझेशनची (SCO) बैठक होतेय. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहे. या बैठकीसाठी जाताना पंतप्रधान मोदींचं विमान पाकिस्तानच्या हद्दीतून जाणार नाही. पाकिस्तानची ऑफर भारताने धुडकावली आहे. बिश्केकला जाताना आता मोदींच विमान हे ओमान, इराण आणि मध्य आशियाई देशांवरून जाणार आहे. भारताने पाकिस्तानच्या हद्दीतून जाऊ नये असं मत व्यक्त केलं जात होतं. बालकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांना पाकिस्तानची हवाई हद्द बंद केली होती. बिश्केकला जाताना पंतप्रधानांसाठी दोन पर्यायांचा विचार करण्यात येत होता. पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून लवकर पोहोचणं शक्य होतं. तर ओमान मार्गाने जास्त वेळ लागणार होता. पाकिस्तानने त्यांचा मार्ग वापरण्याची मंजूरीही दिली होती. मात्र भारताने कडक भूमिका घेत लांबच्या मार्गाने जाण्याचा पर्याय निवडलाय.

सध्या भारतीय विमानांना वळसा घालून जावं लागतं. मात्र पंतप्रधान मोदींसाठी पाकिस्तानने हा नियम शिथील करण्याचा निर्णय घेतला होता. या आधी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या विमानालाही पाकिस्तानने परवानगी दिली होती. मात्र भारताने विनंती धुडकावल्याने पाकिस्तानला योग्य तो संदेश गेल्याचं बोललं जातंय. पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केला असता तर भारताची कडक भूमिका मवाळ झाली असा संदेश गेला असता. त्यामुळे भारताने हा निर्णय घेतलाय.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हेही या बैठकीत सहभागी होणार आहेत. बैठकीदरम्यान हे नेते भेटणार का? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. यावर भारताने आता अधिकृत भूमिका स्पष्ट केलीय. पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान यांची कुठलीही भेट ठरलेली नाही. सध्याच्या परिस्थितीत यापेक्षा जास्त भारताची काहीही प्रतिक्रिया नाही असं स्पष्टीकरण परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी दिलंय.


SCOच्या बैठकीची माहिती देण्यासाठी परराष्ट्रमंत्रालयाने आज पत्रकार परिषद घेतली होती. त्यात सगळ्यांनाच उत्सुकता होती ती मोदी आणि इम्रान खान यांच्या भेटीबद्दलची. गेली काही वर्ष भारताने दहशतवाद्याच्या मुद्यावरून पाकिस्तानसोबतची चर्चा थांबवलेली आहे. त्यामुळे कुठल्याही स्वरुपात अधिकृत चर्चा होण्याची शक्यताच नाही. भारताच्या हवाई हल्ल्यानंतर दोन्ही देशांचे संबंध जास्तच ताणले गेले आहेत.

पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान भेटणार का?

शांतता चर्चा सुरू करण्यासाठी पाकिस्तान भारताकडे वारंवार विनवण्या करत आहे. मात्र दहशतवाद आणि शांतता चर्चा एकाच वेळी सुरू राहू शकत नाही असं भारताने ठामपणे सांगितलं होतं. दहशतवादाला खतपाणी देण्याचं पाकिस्तानने बंद केलं याची खात्री झाल्यावरच चर्चा पुन्हा सुरू होईल असं भारताने म्हटलं आहे.

Loading...

मात्र या आंतरराष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे समोरासमोर येऊ शकतात. त्यावेळी अनौपचारिकपणे दोनही नेत्यांमध्ये काही बोलणं होतं या याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दोनही नेते समोरासमोर आले तर सौजन्य म्हणून बोलणं होऊ शकतं असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 12, 2019 02:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close