सर्वसामान्यांना झटका, गॅस सिलेंडरच्या किमतीत झाली 'इतकी' वाढ

सर्वसामान्यांना झटका, गॅस सिलेंडरच्या किमतीत झाली 'इतकी' वाढ

निवडणुकीच्या गदारोळात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागलीय.

  • Share this:

मुंबई, 01 मे : लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागलीय. सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांनी स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती वाढवल्यात. तशात एलपीजी सिलेंडर 6 रुपयांनी वाढलंय. सबसिडी नसलेल्या सिलेंडरची किंमत 22.5 रुपयांनी वाढलीय. ही किंमत आजपासून ( 1 मे ) लागू झालीय. या वाढीनंतर आता दिल्लीत  सिलेंडरची किंमत 502 रुपये झालीय. सबसिडी नसलेल्या सिलेंडरसाठी 730 रुपयाहून जास्त पैसे मोजावे लागतील. तर मुंबईत सबसिडी असलेल्या गॅस सिलेंडरची किंमत 493.86 रुपये झालीय. बिना सबसिडी सिलेंडर आता 6 रुपयांनी महाग झालंय.

1 एप्रिलपासूनही गॅस सिलेंडरच्या किमती वाढवल्या होत्या. एप्रिलमध्ये म्हणजे गेल्या महिन्यात बिना सबसिडी सिलेंडरची किंमत 5 रुपयांनी वाढवली होती. ती आता 6 रुपयांनी वाढली आहे. तर सबसिडी मिळत असलेल्या सिलेंडरची किंमत दिल्लीत 28 पैशांनी आणि मुंबईत 29 पैशांनी वाढलीय.

सबसिडी मिळत असलेल्या कुटुंबाला वर्षाला 12 सिलेंडर्स मिळतात. सबसिडीचे पैसे थेट बँक खात्यात जातात.

याआधी जून 2018 नंतर सिलेंडरच्या दरात 6 वेळा वाढ झाली होती. त्यानंतर एकूण 6 वेळा कपातही झाली होती. त्यामुळे 14.13 रुपयांची कपात झाली होती. 1 नोव्हेंबर 2018 रोजी सिलेंडरच्या दरात पुन्हा 2.94 रुपयांची वाढ झाली होती.

अनेकदा शहर बदललं की गॅस एजन्सीही बदलावी लागते. तुम्ही वेगळ्या शहरांत शिफ्ट झालात तर गॅस कनेक्शनची प्रक्रिया वेगळी आहे. तुम्हाला जुन्या एजन्सीकडे जाऊन सब्सक्रिप्शन वाऊचर, डोमेस्टिक गॅस कंझ्युमर कार्ड, ट्रान्सफर सब्सक्रिप्शन वाऊचर सिलेंडर आणि रेग्युलेटर जमा करावे लागतील. त्यानंतर वितरक तुम्हाला टर्मिनल वाऊचर तयार करून देईल. तुम्ही दुसऱ्या शहरात जाल तेव्हा तुम्हाला जवळच्या एजन्सीशी संपर्क साधावा लागेल. तुमचं टर्मिनल वाऊचर आणि नव्या घराचा पत्ता द्यावा लागेल. चौकशी पूर्ण जाल्यानंतर नवी गॅस एजन्सी तुम्हाला रेग्युलेटर आणि गॅस सिलेंडर देईल.

VIDEO: 'बुरखा' आणि 'नकाब'वर बंदी आणू नये- रामदास आठवले

First published: May 1, 2019, 12:08 PM IST

ताज्या बातम्या