देशातली पहिली फेमिनिस्ट म्हणून ओळखली जाणारी मराठी विदुषी जिने विवेकानंदांचाही केला होता निषेध

पंडिता रमाबाई 1870मध्ये मोठ्या बंडखोर स्त्री होत्या. विद्वानांनी त्यांना पंडिता म्हटलं. पण त्या ब्राह्मणवादी सत्तेविरोधात बोलायला लागल्या तेव्हा विद्रोही ठरल्या.

  • Share this:

रमाबाईंनी नंतर ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्या काळात स्वामी विवेकानंद जागोजागी सभा घ्यायचे. पण दोघंही एकमेकांना अजिबात पसंत करायचे नाहीत. शिकागो धर्मसभेत दोघंही होते. पण त्यावेळी विवेकानंदांनी स्त्री प्रश्नाकडे दुर्लक्ष केलंय, असं रमाबाईंचं म्हणणं होतं.

विवेकानंदांना हे जाणवलं की रमाबाईंमुळे हिंदू महिला त्यांच्यावर टीका करतात. याचा राग विवेकानंदांच्या मनात होता.

रमाबाईंना पहिली स्त्रीवादी मानलं जायचं. 23 एप्रिल 1858मध्ये चित्तपावन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांनी संस्कृतमध्ये शिक्षण घेतलं. लहानपणी आई-वडिलांचा मृत्यू झाला. रमाबाई पूर्ण देशभर फिरून व्याख्यानं द्यायच्या. त्यांना कन्नड, हिब्रू, बंगाली,मराठी भाषा यायच्या. त्या समाजसुधारकही होत्या.

जेव्हा त्या कलकोत्याला व्याख्यानाला पोचल्या, तेव्हा त्यांची विद्वत्ता पाहून त्यांना सरस्वतीची उपाधी दिली. पण जेव्हा त्यांनी आंतरजातीय लग्न केलं तेव्हा हाच समाज त्यांच्यावर भडकला.

1880मध्ये त्यांनी बंगाली वकील बिपिन बिहारी यांच्याशी लग्न केलं. हे लग्न फक्त आंतरजातीयच नाही तर आंतरक्षेत्रीय होतं. समाजात जणू भूकंप आला होता. लग्नानंतर 2 वर्षांनी त्यांच्या पतीचं निधन झालं, तेव्हा त्यांना एक छोटी मुलगीही होती.

तो काळ होता रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांचा. रमाबाई त्या काळात असलेल्या स्त्रियांच्या प्रश्नांवर आवाज उठवायला लागल्या. ज्या काळात स्त्रीला बाहेर पडणं कठीण जायचं, त्या काळात रमाबाई स्त्रियांनी शिक्षिका आणि इंजिनियर व्हावं असं सांगायच्या. त्या बंडखोर होत्या.

पतीच्या मृत्यूनंतर पंडिता पुण्यात स्थायिक झाल्या होत्या. त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. बालविवाह थांबवण्याचं काम त्या करायच्या.

1883मध्ये त्या इंग्लडला गेल्या. नंतर त्यांनी आणि त्यांच्या मुलीनं ख्रिश्चन धर्म स्वीकारला. पुढे त्यांनी शिक्षण कार्यात झोकून दिलं. त्या स्वत: इंग्लिश शिकल्या. त्या काळात ज्योतिराव फुले आणि सावित्रिबाई या दाम्पत्यांनी त्यांना पाठिंबा दिला.

ब्रिटनमध्ये असताना त्यांनी ‘द हाई कास्ट हिंदू विमेन’ पुस्तक लिहिलं. त्यात हिंदू धर्मातल्या सती, बालविवाह या प्रथांविरोधात आवाज उठवला. रमाबाईंनी महाराष्ट्रातही काम केलं. गुलबर्गात एक शाळा सुरू केली. कितीही विरोध झाला तरू त्यांनी विधवांच्या कल्याणासाठी काम केलं.

ब्रिटनमध्ये असताना त्यांनी ‘द हाई कास्ट हिंदू विमेन’ पुस्तक लिहिलं. त्यात हिंदू धर्मातल्या सती, बालविवाह या प्रथांविरोधात आवाज उठवला. रमाबाईंनी महाराष्ट्रातही काम केलं. गुलबर्गात एक शाळा सुरू केली. कितीही विरोध झाला तरी त्यांनी विधवांच्या कल्याणासाठी काम केलं.

1886मध्ये रमाबाई अमेरिकेला गेल्या. त्यावेळी शिकागो परिषद झाली. शिकागो धर्मसभेत दोघंही होते. पण त्यावेळी विवेकानंदांनी स्त्री प्रश्नाकडे दुर्लक्ष केलंय, असं रमाबाईंचं म्हणणं होतं.

विवेकानंद यांनी शिकागोमध्ये ऐतिहासिक भाषण केलं. त्याबद्दल रमाबाई म्हणाल्या बाहेरच्या दिखाव्यावर भुलू नका.

त्यानंतर रमाबाईंवर विवेकानंदांनीही खूप टीका केली.

रमाबाईंच्या कार्याचं कौतुक जगभर झालं. युरोप चर्चमध्ये 5 एप्रिल रोजी त्यांच्या नावे फिस्ट डे सेलिब्रेट केला जातो. त्यांच्या नावे भारतात पोस्टाचं तिकीट निघालं. पण भारतात समाजसुधारक म्हणून मान्यता दिली गेली नाही, हे मोठं दुर्दैव.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 8, 2019 07:50 PM IST

ताज्या बातम्या