मुंबई, 14 जानेवारी : फेब्रुवारीपासून टीव्हीचा खर्च कमी होणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI)च्या आदेशानुसार प्रेक्षक दर महिन्याला 153 रुपये ( जीएसटी धरून ) खर्च करून 100 चॅनेल्स पाहू शकतात. 31 जानेवारीपर्यंत ही चॅनेल्स तुम्ही निवडू शकता. कारण 1 फेब्रुवारीपर्यंत हे नवे नियम लागू होतायत.
ग्राहकांच्या मोबाईलवर sms पाठवून ही माहिती दिली जातेय. TRAIनं दिलेल्या 2 टेलिफोन नंबर आणि ईमेल आयडीवरूनही तुम्हाला माहिती मिळू शकते.
153 रुपयांत काय काय मिळणार?
153 रुपयात 100 चॅनेल्सच्या स्लाॅटसाठी नेटवर्क कपॅसिटी फी द्यावी लागेल. यात जर तुम्ही फ्री टू एअर चॅनेल निवडलेत तर अतिरिक्त चार्ज पडणार नाही. पेड चॅनेलसाठी तुम्हाला त्या बुकेप्रमाणे पैसे द्यावे लागतील.
इथे करा फोन
ग्राहक 011-23237922 (एके भारद्वाज) आणि 011-23220209 (अरविंद कुमार) यानंबरवर फोन करू शकतात. advbcs-2@trai.gov.in किंवा arvind@gove यावर ईमेल करून माहिती घेऊ शकता.
100हून जास्त चॅनेल्ससाठी इतके पैसे द्यावे लागणार
जर तुम्हाला 100हून जास्त चॅनेल पाहायचे असतील ( असे ग्राहक 10 ते 15 टक्के आहेत ) तर पुढच्या 25 चॅनेल्सना 20 रुपये द्यावे लागतील. एका चॅनेल्ससाठी कमीत कमी शून्य ते जास्तीत जास्त 19 रुपये खर्च करावे लागतील. इतर चॅनेल्स वेगवेगळ्या बुकेच्या रूपात तुम्हाला निवडता येतील.
नव्या सिस्टिमची सुरुवात अगोदर 29 डिसेंबर 2018पासून होणार होती, पण त्यानंतर 1 फेब्रुवारी 2019पर्यंत ती मुदत वाढवली.
त्यामुळे आता ग्राहकाला कुठलाही केबल आॅपरेटर फसवू शकत नाही. मनमानीही करू शकत नाही. फक्त ग्राहकांनी काळजीपूर्वक चॅनेलची निवड करावी.
एका आठवड्यात 'ही' लक्षणं दिसली, तर समजा तुम्ही गरोदर आहात