PulwamaTerror Attack : नुकतीच सुट्टी संपवून परतले होते तिलक, 15 दिवसांपूर्वी झालेला मुलगा

PulwamaTerror Attack : नुकतीच सुट्टी संपवून परतले होते तिलक, 15 दिवसांपूर्वी झालेला मुलगा

जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कांगडाचे जवान तिलक राज शहीद झालेत.

  • Share this:

मुंबई, 15 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कांगडाचे जवान तिलक राज शहीद झालेत. कांगडाच्या शहापूरच्या धारकला गावात तिलक राज 11 फेब्रुवारीलाच सुट्टी संपवून घरून निघाले होते. महत्त्वाचं म्हणजे तिलक राजच्या पत्नीनं 15 दिवसांपूर्वीच मुलाला जन्म दिला होता. तिलक यांचा पहिला मुलगा वन्नू दोन वर्षांचा आहे.

गेल्या महिन्यात तिलक यांच्या पत्नीनं मुलाला जन्म दिला. तिलक राज मूळचे शाहपूरच्या धारकंडीच्या बतुनी गावातले आहेत. काही वर्षांपूर्वी ते धारकला इथे शिफ्ट झाले होते. तिलकची बातमी मिळताच सगळा गाव शोकसागरात बुडाला.

तिलक राज लोकसंगीत गायचे. त्यांनी अनेक हिट हिमाचली गाणी गायली आणि लिहिलीही. त्यांचे वडील लायक राम शेतकरी होते. तिलक गद्दी समाजाचे होते. ते कब्बडीचे चांगले खेळाडू होते.

सध्या जयराम ठाकूर सरकारनं मंत्री किशन कपूर आणि आमदार अर्जुन ठाकूर यांना तिलक राजच्या घरी पाठवलंय. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी तिलक राज यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केलाय आणि जखमी सैनिकांना लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना केली.

पुलवामाच्या थरकाप उडवणाऱ्या दहशतवादी हल्ल्यात बिहारचे दोन पुत्र शहीद झालेत. यात भागलपूरचे रतन कुमार ठाकूर आणि पाटण्याचे संजय कुमार सिन्हा आहेत. संजय हेड काॅन्स्टेबल म्हणून देशाची सेवा करायचे. तर संजयचे वडील महेंद्र प्रसाद सीआरपीएफच्या 176व्या तुकडीत होते.

संजय एक महिन्याच्या सुट्टीवरून परतले होते. 8 फेब्रुवारीला ड्युटीवर आले होते. ते कँपवरही पोचले नव्हते, तेवढ्यातच दहशतवाद्यांनी डाव साधला. दहशतवादी हल्ल्यात ते शहीद झाले.

घरून परतताना आपली पत्नी बबिता देवी यांना सांगितलं होतं की ते 15 दिवसाची सुट्टी घेऊन घरी येणार आहेत. सुट्टीत मोठी मुलगी रुबीचं लग्न ठरवून ते ड्युटीवर जाणार होते.

त्यांची छोटी मुलगी टुन्नीनंही पदवी मिळवलीय. मुलगा सोनू राजस्थानच्या कोटामध्ये राहून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षेची तयारी करतोय.

संजयचा छोटा भाऊ शंकर सिंगही सीआरपीएफमध्ये आहे. तो नालंदाला असतो. त्याचं कुटुंब मसौढी कोर्टाजवळ नव्या घरी राहतं.

संजयच्या कुटुंबात त्याचे आईवडील आहेत. संजय सगळ्यांशी मिळून मिसळून राहायचे. सर्वांना मदत करायचे. या हल्ल्यात संजय यांचा मृत्यू झाल्याची पहिली बातमी त्यांच्या मेव्हण्यांना कळली. अख्खा गाव शोकसागरात बुडाला.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्लात 44 जवान शहीद झाले आहेत. या शहिदांमध्ये संजय राजपूत आणि नितीन राठोड या महाराष्ट्रातील दोन सुपुत्रांचा समावेश आहे.

दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान संजय राजपूत हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर इथले आहेत. तर शहीद नितीन राठोड हे बुलढाण्यातीलच लोणार तालुक्यातील आहेत. या जवानांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर त्यांच्या गावी मोठा आक्रोश करण्यात आला.

'तुम्ही खूप मोठी चूक केली आहे,' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी संघटनांना इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे.

या कुरापतींनी आणि भ्याड हल्ल्याने भारतात अस्थिरता पसरेल असं शेजारी देशाला वाटत असेल तर चुकीचं असल्यांच पंतप्रधान मोदी म्हणाले. ज्या वाटेने तुम्ही चालला आहात तो उद्ध्वस्त करणारा रस्ता असून याचे सडेतोड उत्तर दिलं जाईल असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला. या हल्ल्याचा अनेक देशांनी निषेध केला असून भारतासोबत असल्याचे म्हटले आहे. सर्व देशांनी दहशतवाद्यांविरोधात एकत्र येण्याची गरज आहे.

दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ला :

पुलवामा येथील अवंतीपोरा येथील गोरीपोरा सीआरपीएफच्या ताफ्यावर IEDद्वारे हल्ला केला. हल्लाजैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.या घटनेनंतर पुलवामा येथे असलेल्या सर्व जवानांना, राज्य पोलीस दल आणि सीआरपीएफच्या अन्य तुकड्यांना अवंतिपोरा येथे पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला. तसेच परिसरात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. राज्यातील पुलवामा, शोपियां, कुलग्राम आणि श्रीनगर जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. काश्मीरमधील हा गेल्या तीस वर्षांतला सर्वात मोठा मानला जात आहे.

मुस्लिम बांधवांनी दिल्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा

First Published: Feb 15, 2019 01:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading