इलेक्शन फीवर अजून संपलेला नाही; विधानसभेसाठी या 4 राज्यांमध्ये धामधूम सुरू

इलेक्शन फीवर अजून संपलेला नाही; विधानसभेसाठी या 4 राज्यांमध्ये धामधूम सुरू

येत्या 8 महिन्यात 4 राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. ही सर्व राज्ये राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 जून: जवळ जवळ 4 महिने चाललेल्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आणि केंद्रात नवे सरकार स्थापन झाले. एकूण लोकशाहीचा उत्सव म्हणून याकडे पाहिले जात असले तरी अखेरच्या टप्प्यात कधी एकदा निवडणुका संपतात असे वाटत होते. पण लोकसभा निवडणुका झाल्या असल्यातरी अद्याप निवडणुकीची रणधुमाळी अद्याप संपली नाही. येत्या 8 महिन्यात 4 राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. ही सर्व राज्ये राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहेत. यात महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा आणि झारखंड या राज्यांचा समावेश आहे. या विधानसभा निवडणुकांची तयारी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेच सुरू झाली आहे. वरील 4 राज्यात विधानसभेच्या 529 जागा आहेत. ज्यातील 216 जागांवर भाजपचे आमदार आहेत तर 59 जागांवर काँग्रेसचे आमदार आहेत. आपचे 66, शिवसेनेचे 63 सदस्य आहेत. या तिन्ही राज्यात केंद्रात सत्तधारी असलेला भाजप काय कमाल करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्रात भाजप सरकार आहे तर दिल्लीत आप आदमी पक्षाचे सरकार आहे. भाजपने यावेळी पुन्हा एकदा दिल्लीची सत्ता मिळवण्यासाठी जोर लावला आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मुख्यमंत्री अरविंद केजरीवला यांनी भाजपवर सर्वाधिक टीका केली आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयामुळे भाजपचा उत्साह आणखी वाढला आहे. तर जाणून घेऊयात या विधानसभा निवडणुकीतील समीकरणे...

महाराष्ट्र- राज्यात सध्या भाजप-शिवसेना युतीचे सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील या सरकारचा कालावधी सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंतचा आहे. राज्यातील 288 जागांच्या विधानसभेत भाजपकडे सर्वाधिक 122 आमदार आहेत. तर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडे 63 आमदार आहेत. विरोधकांमध्ये असलेल्या काँग्रेसकडे 42 तर राष्ट्रवादीकडे 41 जागा आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत होय नाही म्हणत भाजप शिवसेना एकत्र आले आणि त्यांनी मोठे यश मिळवले. भाजपने 23 जागा तर शिवसेनेने 18 जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या तर काँग्रेसला एकच जागा जिंकता आली. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता राज्यात युतीची ताकद अधिक जास्त आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेत काँग्रेसचा मोठा पराभव झाल्यामुळे विधानसभा त्यांच्यासाठी जड जाणार आहे असे दिसते.

दिल्ली- देशात जरी भाजपची सत्ता असली तरी राजधानी दिल्लीत अरविंद केजरीवला यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचे सरकार आहे. आपकडे विधानसभेतील 70 पैकी 67 जागा होत्या त्या आता 66 झाल्या आहेत. भाजपकडे 7 जागा आहेत. केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे दिल्लीत विजय मिळवण्याची त्यांना आशा आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या दिल्लीतील 3 महानगर पालिकेवर भाजपने भगवा फडकावला होता. पण केजरीवाल सरकारने शिक्षण, आरोग्य, वीज आणि पाणी या पातळीवर चांगले काम केले आहे. त्याच बरोबर महिलांसाठी मेट्रो आणि बसमधून मोफत प्रवास करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णयाकडे निवडणुकीची तयारी या अर्थाने पाहिले जात आहे. लोकसभेत भलेही दिल्लीकरांनी भाजपला संधी दिली असली तरी विधानसभेत पुन्हा आपलाच निवडूण देतील. या दोन्ही पक्षांशिवाय काँग्रेस देखील पुन्हा एकदा दिल्ली जिंकण्यासाठी जोर लावेल. जानेवारी 2020मध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

हरियाणा- विधानसभेच्या 90 जागा असलेल्या या राज्यात ऑक्टोबर 2014मध्ये निवडणुका झाल्या होत्या. तेव्हा भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही उमेदवार दिला नव्हता. मोदींचा चेहरा पुढे करून भाजपने काँग्रेसचा गढ मानल्या जाणाऱ्या या राज्यातील सत्ता ताब्यात घेतली होती. तेव्हा भाजपने विधानसभेच्या 47 जागा मिळाल्या होत्या आणि सरकार स्थापन केले होते. संघाचे प्रचारक असलेले मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेत शानदार कामगिरी केली होती. लोकसभा निवडणुकीत राज्यातील 10च्या 10 जागा भाजपला मिळाल्या आहेत. तेव्हा आगामी विधानसभा निवडणुकीत देखील खट्टर हाच भाजपचा चेहरा असेल. जींद येथील पोटनिवडणुकीतील विजयामुळे भाजपचे संख्याबळ 48 झाले आहे. राज्यात इनेलो आणि काँग्रेसकडे प्रत्येकी 17 जागा आहेत. राज्यात काँग्रेसची संघटना कमकुवत झाल्याची चर्चा आहे.

झारखंड- राज्यात भाजपचे सरकार असून रघुवर दास मुख्यमंत्री आहेत. विधानसभेच्या 82 पैकी 81 जागांवर निवडणुका होतात. एक जागेवर राज्यपालांद्वारे निवड केली जाते. 2014मध्ये भाजपने 37 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर झारखंड विकास मोर्चाचे 6 आमदार भाजपमध्ये आले होते त्यामुळे सरकारची काळजी मिटली होती. सध्या भाजपकडे 43 जागा आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाकडे 19 तर झारखंड विकास मोर्चाकडे 8 आमदार आहेत. राज्यात नव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्यातील लोकसभेच्या 14 पैकी 11 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. सत्ताधारी भाजपने आतापासूनच विधानसभेची तयारी सुरु केली असून 'अबकी बार 60के पार' असा नारा देखील त्यांनी दिला आहे.

VIDEO : गुजरातमध्ये दलित तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण, दारू विकण्यास केला होता विरोध

First published: June 3, 2019, 8:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading