नवा खुलासा, मनमोहन सिंग सरकारने दिला नव्हती #MissionShaktiला परवानगी!

नवा खुलासा, मनमोहन सिंग सरकारने दिला नव्हती #MissionShaktiला परवानगी!

DRDOचे माजी प्रमुख डॉ. व्ही.के. सारस्वत यांनी हा खुलासा केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 27 मार्च : 'मिशन शक्ती'वर देशभर चर्चा सुरू असताना आता नवा खुलासा आलाय. या मोहिमेला नेमकी परवानगी कुणी दिली? यावर जोरदार वाद-प्रतिवाद होत आहे. युपीएचं सरकार असताना या मोहिमेचं प्रेझेंटेशन DRDO ने त्यावेळी दिलं होतं मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या मोहिमेला परवानगी दिली नाही अशी माहिती पुढे आलीय.

DRDOचे माजी प्रमुख डॉ. व्ही.के. सारस्वत यांनी हा खुलासा केला आहे. ते म्हणाले, युपीएचं सरकार असताना त्यावेळचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यासमोर या प्रकल्पाचं प्रेझेंटेशन दिलं गेलं होतं. त्यावर चर्चाही झाली होती. पण दुर्दैवानं सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शास्त्रज्ञ पुढे जाऊ शकले नाहीत.

भारताचं अंतराळातलं हे सर्वात मोठं यश आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यानंतर आता राजकारणाला सुरुवात झालीय. या प्रकल्पाला युपीए सरकार असतानाच मान्यता दिली होती असा दावा काँग्रेसने  केलाय तर मोदी सत्तेत आल्यानंतर पवानगी दिली असा खुलासा सरकारच्या वतीने करण्यात आलाय.

निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना यावरून राजकारण झालं नसतं तरच नवल होतं. काँग्रसचे नेते अहमद पटेल यांनी ट्विट करून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीच परवानगी दिली होती असा दावा केला होता. तर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हा दावा खोडून काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014मध्ये  या मोहिमेला परवानगी दिली होती असा खुलासा जेटली यांनी केला.

First published: March 27, 2019, 5:46 PM IST
Tags: DRDO

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading