VIDEO : उत्तर प्रदेशात भीषण अपघात, ट्रकच्या धडकेनंतर व्हॅन पेटल्याने 7 जणांचा होरपळून मृत्यू

ट्रक आणि व्हॅनची समोरासमोर धडक झाली. या धडकेनंतर व्हॅनला आग लागल्याने 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

ट्रक आणि व्हॅनची समोरासमोर धडक झाली. या धडकेनंतर व्हॅनला आग लागल्याने 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

  • Share this:
    उन्नाव, 16 फेब्रुवारी : आग्रा-लखनऊ एक्सप्रेस हायवेवर आणखी एक भीषण दुर्घटना घडली आहे. उन्नाव टोल प्लाझाजवळ ट्रक आणि व्हॅनची समोरासमोर धडक झाली. या धडकेनंतर व्हॅनला आग लागल्याने 7 जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातानंतर शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. उन्नावचे डीएम देवेंद्र कुमार पांडे यांनी सांगितले की, अपघातानांतर एकूण 7 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. गाडी उन्नावमधील अंकित वाजपेयी यांच्या नावावर नोंद आहे. ते व्हॅनमध्ये होते की नव्हते हे समजू शकलेलं नाही. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. टोल प्लाझाजवळ एक व्हॅन येत होती. विरुद्ध दिशेनं असल्याने व्हॅनला अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. व्हॅनमधील मृतदेह काढण्यात आले असून ओळख पटवण्यात येत आहे. या अपघातानंतर मोठा गोंधल उडाला. याठिकाणी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं. प्रशासकिय अधिकाऱ्यांनीसुद्धा घटनास्थळी धाव घेतली. उन्नावचे एसपी विक्रांतवीर यांनी सांगितले की, व्हॅनचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. व्हॅनमध्ये सीएनजी कीट लावण्यात आले होते. दुर्घटनेनंतर ट्रकचा ड्रायव्हर पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. वाचा : स्कूल व्हॅनचा स्फोट होऊन लागली आग, 4 मुलांचा जळून मृत्यू याआधी 10 जानेवारीला कन्नौज इथं बस आणि ट्रकची जोराची धडक झाली होती. तेव्हाही वाहनांना आग लागली होती. यातून 40 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. अनेक प्रवासी यामध्ये अडकले होते. त्यांना सुखरूप वाचवण्यात यश आलं होतं. वाचा : जामियात पोलिसांकडून मारहाणीआधीचा धक्कादायक VIDEO, विद्यार्थ्यांच्या हातात दगड?
    First published: