Home /News /national /

यूपीतला ६ वर्षांचा चोर! आतापर्यंत 10 वेळा तुरुंगाची खाली हवा

यूपीतला ६ वर्षांचा चोर! आतापर्यंत 10 वेळा तुरुंगाची खाली हवा

Viral: उत्तर प्रदेशमधल्या एका 6 वर्षांच्या चिमुरड्याचे कारनामे तुम्ही ऐकलात तर, तुम्हालाही धक्का बसेल.

    उत्तर प्रदेश, 21 मे: उत्तर प्रदेशमध (Uttar Pradesh) ल्या एका 6 वर्षांच्या चिमुरड्याचे कारनामे तुम्ही ऐकलात तर, तुम्हालाही धक्का बसेल. महराजगंज येथील हा चिमुरडा चक्क चोर (Thief) आहे. हो, तुम्ही ऐकलात ते खरं आहे. ज्या वयात मुलं शाळेत जातात त्या वयात हा मुलगा चक्क शहरात चोरी करतोय. सध्या हा मुलगा सोशल मीडिया चांगलाच ट्रेंड होत आहे. शॉपिंग मॉल असो किंवा छोटीछोटी दुकानं हा मुलगा चोरी करण्यात एक्सपर्ट आहे. या चिमुरड्याच्या चोरीचे असे एक- एक किस्से आहेत की मोठंमोठे चोरही याच्या पुढे फेल ठरतात. पोलीस ज्यावेळी या मुलाला पकडतात त्या- त्यावेळी त्याच्या पाकीटातून पोलिसांना नोटांचं बंडल सापडलं आहे. या 6 वर्षाच्या मुलाच्या कारनामामुळे पोलिसचं नाही तर शहरातील व्यापारी त्रासले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी त्याला बऱ्याचंदा अटकही केली आहे. आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यानं बऱ्याचंदा तुरुंगवारीही केली आहे. तब्बल 10 वेळा हा मुलगा तुरुंगवारी (10 times prison ) करुन आला आहे. त्यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून 50 हजार आणि एक लाख रुपये जप्त केले. भोळा चेहरा असलेल्या या मुलाचे कारनामे संपूर्ण महराजगंजमध्ये प्रसिद्ध आहे. शहरातले दुकानदार आणि व्यापारी याला घाबरुन असतात. छोट्याशा जागेतून, खिडकी, शटर याच्या खालून दुकानात घुसून चोरी करण्यात हा चिमुरडा माहिर आहे. हेही वाचा-  VIDEO: क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं, झाड कोसळून तरुणाचा मृत्यू पोलीस जेव्हाही चोरी झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासतात त्यावेळी हा मुलगा घटनास्थळी संशयास्पद अवस्थेत आढळून आलेला असतो. आपल्याला पोलिस पकडतील याची या मुलाला जराही भीती नाही आहे. पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर तो शांतपणे बसून राहतो आणि पोलिसांनी दंडुका दाखवल्यानंतर जोरजोरात रडू लागतो. त्यामुळे काही अनुचित घडू नये यासाठी पोलीसही सावध पाऊल उचलतात. पोलीस सांगतात या 6 वर्षाच्या चोराला सिगरेट पिण्याचंही व्यसन आहे. चोरीच्या घटनेनंतर या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये आणलं जातं. त्यानंतर पीडित व्यापारी मुलाचा भोळा चेहरा बघून आपली तक्रार मागे घेतात. मुलाचं वय पाहून पोलीस त्याच्या कुटुंबियाला बजावून सोडून देतात. मात्र अजूनही या मुलामध्ये काही बदल झालेला नाही. या मुलाला घाबरुन बऱ्याच दुकानदारांनी आपल्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत वेगवेगळ्या घटनांमध्ये जवळपास 10 वेळा अटक केली. मात्र त्यात काही बदल झालेला नाही.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Crime, Social media viral, Uttar pardesh

    पुढील बातम्या