पेपरमध्ये 100 रुपये ठेवा आणि पास व्हा! कॉपी करण्यासाठी मुख्याध्यापकांची बंपर ऑफर

पेपरमध्ये 100 रुपये ठेवा आणि पास व्हा! कॉपी करण्यासाठी मुख्याध्यापकांची बंपर ऑफर

विद्यार्थ्यांनी कॉपी कशी करायची याचे धडे चक्क मुख्याध्यापकांनीच दिले आहेत. मुख्याध्यापकांनी दिलेल्या टिप्सचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. कळस म्हणजे ही कॉपी करण्यासाठी 100 रुपये मोजावे लागतील असंही त्यांच्याकडून बजावण्यात आलं आहे.

  • Share this:

उत्तर प्रदेश, 20 फेब्रुवारी : प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं या डायलॉगचा कोण कधी कसा अर्थ घेईल  सांगता येत नाही. बोर्डाच्या परीक्षा या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी कुठल्या युद्धापेक्षा कमी नसतात. आता हे युद्ध जिंकण्यासाठी विद्यार्थ्यांनी कॉपी कशी करायची याचे धडे चक्क मुख्याध्यापकांनीच दिले आहेत. मुख्याध्यापकांनी दिलेल्या टिप्सचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. कळस म्हणजे ही कॉपी करण्यासाठी 100 रुपये मोजावे लागतील असंही त्यांच्याकडून बजावण्यात आलं आहे. एकदा तुम्ही 100 रुपये ठेवले की मग पेपरमध्ये तुम्ही काही लिहिलं असेल-नसेल, तुमचे मार्क्स पक्के आहेत. असं चक्क या मुख्याध्यापकांनी सांगितलं आहे.

उत्तप्रदेशातील लखनऊपासून 300 किलोमीटरवर असणाऱ्या मऊमध्ये ही धटना घडली आहे. त्यामुळे देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. हरिवंश मेमोरिअल इंटर कॉलेजचे मॅनेजर तसंच मुख्याध्यापक असणाऱ्या महाशयांचा हा 'ज्ञान' देणारा व्हिडीओ व्हायरल झाल्याने शिक्षण व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

कॉपी करताना सगळ्यात मोठी भीती असते ती पकडलं जाण्याची पण विद्यार्थ्यांच्या मनातल्या या भीतीवरही मुख्याध्यपकांनी जालीम उपाय सुचवला. विशेष म्हणजे कॉपी करताना पकडल्यास  कशी सुटका करून घ्यायची याच्या टिप्सही मुख्याध्यापक महोदयांनी देवून टाकल्या. सध्या उत्तर प्रदेशमध्ये माध्यमिक मंडळाच्या परीक्षा सुरु झाल्यात. एका बाजुला कॉपीमुक्त परीक्षेसाठी सरकार प्रयत्न करत असताना मुख्याध्यापकाचा व्हायरल झालेला व्हिडिओ परीक्षा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो आहे.

(हेही वाचा-जमिनीत आढळलं तब्बल 3 हजार टन सोन्याचं घबाड)

एका विद्यार्थ्यानं मुख्याध्यापकांचा व्हिडीओ उत्तर प्रदेश सरकारच्या पोर्टलवर अपलोड केला आणि त्याचे कॉपीधड्याचं पितळ उघडं पडलं. मुख्याध्यापकाच्या या प्रतापी भाषणानं बोर्डाची चांगलीच नाचक्की झाली आहे. प्राचार्याला अटक झाली असली तरी जो बूंद से यई वो हौद से नहीं आती असंच म्हणावं लागेल. आपल्याकडेही कॉपी बहाद्दरांची संख्या कमी नाही. कॉपी करणारे आणि कॉपी पुरवणारे कायम कॅमेऱ्यात कैद होत आलेत. पण उत्तर प्रदेशातल्या या महाशयांनी जो कळस गाठलाय तो शिक्षण क्षेत्रातलं किळसवाणं वास्तव मांडणारा आहे. वर्षभर शाळेत अभ्यासाचे नीट धडे दिले असते तर पोरांसमोर कॉप्यांचे धडे गिरवावे लागले नसते.

First published: February 20, 2020, 7:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या