महिलेनं प्रेमसंबंधाचा आरोप केल्यामुळे साधूने कापले स्वत:चे गुप्तांग!

महिलेनं प्रेमसंबंधाचा आरोप केल्यामुळे साधूने कापले स्वत:चे गुप्तांग!

जखमी साधूवर शासकीय रुग्णालयात उपचार असून प्रकृती गंभीर आहे.

  • Share this:

 

उत्तरप्रदेश, 20 आॅक्टोबर : आपल्यावर प्रेम संबंधाचे आरोप झाल्यामुळे परेशान झालेल्या एका ४५ वर्षीय साधूने आपले गुप्तांग कापल्याची घटना उत्तरप्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील घटी गावात घडलीये.

जखमी साधूवर शासकीय रुग्णालयात उपचार असून प्रकृती गंभीर आहे. या जखमी साधूला ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलंय.

डीएसपी राघवेंद्र सिंह यांनी सांगितलं की, मैदानी बाब असं या साधूचं नाव आहे. तो गेल्या काही वर्षांपासून डांडो रोडच्या जंगलाला लागून असलेल्या परिसरातील रिकाम्या जागेवर एका आश्रमात राहत होता.

टाइम्स आॅफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मैदानी बाबा गेल्या नऊ दिवसांपासून उपवास करत होते. त्यांच्यावर एका स्थानिक महिलेनं प्रेम संबंधाचे आरोप केले होते. या महिलेच्या आरोपामुळे मैदानी बाबा वैतागले होते.

शुक्रवारी जेव्हा काही लोकं आश्रमावर पोहोचले तेव्हा मैदानी बाबाला रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं. लोकांनी तातडीने पोलिसांना फोन करून माहिती दिली. त्यांनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मैदानी बाबाला शासकीय रुग्णालयात दाखल केलं. ट्रॉमा सेंटरच्या डाॅक्टरांनी साधूची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं. मैदानी बाबाकडून गुप्तांगाचा ८० टक्के भाग कापला गेला असून सर्जरी करण्यात आली अशी माहिती डाॅक्टरांनी दिली.

डीएसपी राघवेंद्र सिंह यांनी सांगितलं की, याआधी मैदानी बाबावर दोन जणांनी आरोप केला होता. या दोन्ही व्यक्तींनी माझ्यावर एका महिलेसोबत प्रेम संबंधाचे आरोप करून माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहे असा दावा मैदानी बाबाने केला होता. या प्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल असं राघवेंद्र सिंह यांनी सांगितलं.

========================================

First published: October 20, 2018, 6:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading