मराठी बातम्या /बातम्या /देश /

‘विवाह’ सिनेमाची स्टोरी प्रत्यक्षात! पाठीचा कणा मोडलेल्या भावी पत्नीशी तरुणानं केलं लग्न

‘विवाह’ सिनेमाची स्टोरी प्रत्यक्षात! पाठीचा कणा मोडलेल्या भावी पत्नीशी तरुणानं केलं लग्न

सूरज बडजात्या (Soorj Barjatya) यांच्या ‘विवाह’ (Vivah) या 2006 साली सिनेमातला हा प्रसंग उत्तर प्रदेशात प्रत्यक्षात घडला आहे. ऐन लग्नापूर्वी झालेल्या अपघातामध्ये पाठीचा कणा मोडलेल्या भावी पत्नीशी तरुणाने लग्न केले.

  • Published by:  News18 Desk
प्रयागराज, 16 डिसेंबर : लग्नाची सर्व तयारी झालेली आहे. मुलाचं वऱ्हाड नियोजित वेळेप्रमाणे पोहचणार असतं, त्याचवेळी नवरी मुलीचा अपघात होतो. लग्नाची लगबग सुरु असणाऱ्या घरातलं वातावरण बदलतं, मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ त्यांच्यावर येते. मुलीचा पाठीचा कणा मोडल्याचं स्पष्ट होतं. भावी पत्नीला झालेला हा अपघात पाहून देखील तिच्या होणाऱ्या पतीचं मन बदलत नाही. तो तिच्याशी लग्न करतो. सूरज बडजात्या (Soorj Barjatya) यांच्या ‘विवाह’ (Vivah) या 2006 साली सिनेमातला हा प्रसंग उत्तर प्रदेशात प्रत्यक्षात घडला आहे. त्या सिनेमात अमृता राव तिच्या चुलत बहिणीला वाचवण्याच्या नादात आगीमध्ये अडकते. अमृताचा चेहरा भाजतो आणि तिचा सिनेमातला हिरो म्हणजेच शाहिद कपूर तिच्याशी लग्न करतो. विवाह सिनेमात शाहिदनं जी भूमिका केली आहे, ती खऱ्या आयुष्यात करण्याचं धैर्य प्रयागराजमधल्या अवधेश या तरुणानं दाखवलं आहे. काय आहे प्रकरण? अवधेशचं लग्न प्रतापगडमधली कुंडा या गावाच्या आरतीशी ठरलं होतं. या लग्नासाठी 8 डिसेंबर रोजी अवधेशचं वऱ्हाड आरतीच्या गावी येणार होते. त्याच दिवशी दुपारी तीन वर्षांच्या भाचीबरोबर खेळताना आरती गच्चीवरुन खाली पडली. या अपघातामध्ये तिच्या पाठीचा कणा मोडला आणि पायांची शक्तीही गेली. आरतीला प्रयागराजमधल्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हे वाचा-दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून टवाळ तरुणांनी केली मारहाण, VIDEO VIRAL अवधेशच्या घरी ही बातमी समजताच त्याच्या घरातील मंडळी आरतीला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आली. त्यांनी अवधेशला देखील सर्व परिस्थितीची माहिती दिली. आरतीच्या लहान बहिणीशी लग्न करण्याचा प्रस्ताव देखील घरातल्या मंडळींनी अवधेशसमोर ठेवला होता. अवधेशनं तो प्रस्ताव फेटाळला. आरतीच आपल्या आयुष्याची जोडीदार असेल आणि तिची साथ जन्मभर करेल असा निर्धार अवधेशनं केला. अवधेशची जबरदस्त इच्छा अखेर त्याच्या घरच्यांनाही मान्य करावी लागली. त्यांनी आरतीला डॉक्टरांच्या परवानगीनं एक दिवसासाठी खास अ‍ॅम्बुलन्समधून एक दिवसासाठी घरी आणले. आरतीच्या घरी दोघांचे लग्न झाले आणि आता पुन्हा आरतीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. अवधेश आणि आरतीच्या या अनोख्या लग्नाची गावात जोरदार चर्चा होत आहे. प्रत्यक्ष आयुष्यात हिरोचं काम करणाऱ्या अवधेशची सर्वजण प्रशंसा करत आहेत.
First published:

Tags: Marriage, Uttar pradesh

पुढील बातम्या