लखनौ, 7 डिसेंबर: लग्नाच्या आदल्या दिवशी घरात हळदीचा कार्यक्रम सुरु होता. नवरीच्या स्वागतासाठी सर्व घर सज्ज झाले होते. घरात सर्वांच्या आनंदाला उधाण आले होते. सर्वत्र कामांची लगबग सुरु होती. वातावरणात सगळीकडे उत्साह होता. पाहुण्यामंडळींचेही आगमन सुरु झाले होते. नवरा मुलगाही आनंदी होता. तो हळदीचा विधी संपवून तयार होण्यासाठी त्याच्या खोलीत गेला, तो जिवंत परत आलाच नाही. त्या खोलीमधून त्याचा मृतदेहच बाहेर आला.
उत्तर प्रदेशातील (U.P.) शहाजहांपूरमधील (Shahjahanpur) लियाकत अलींच्या घरातील ही दुर्दैवी घटना आहे. माशूक अली असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. लग्नाच्या ऐन आदल्या दिवशी त्यांच्या मुलाची अंत्ययात्रा निघाली. लियाकतचे यांचे तीन मुलं कुवेतमध्ये सलूनमध्ये कामाला होते. माशूक खास लग्नासाठी त्याच्या गावी आला होता.
घरात पसरली स्मशानशांतता!
माशूक विधी पूर्ण झाल्यानंतर तयार होण्यासाठी त्याच्या रुममध्ये गेला होता. बराच वेळ झाला तरी तो परत आला नाही त्यामुळे त्याच्या भावांनी माशूकच्या रुमकडे धाव घेतली. रुमचा दरवाजा आतून बंद होता. माशूककडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने घरच्या मंडळींनी दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. दरवाजा तोडून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. रुममधील दृश्य पाहिल्यानंतर घरातील आनंदी वातावरणाचे काही क्षणातच स्माशनशांततेत झाले.
मृत्यूचे कारण काय?
माशूकला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. हार्टॲटॅकने माशूकचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर लग्नाच्या आदल्या दिवशीच माशूकवर कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले.